उर्फी माझ्या हाती लागली, तर तिला थोबडणारच, चित्रा वाघ भडकल्या

urfi javed & Chitra wagh
urfi javed & Chitra wagh

मुंबई : पुढारी वृत्तसेवा – सार्वजनिक ठिकाणी आता जर अभिनेत्री उर्फीने चाळे केले; तर आम्ही चालू देणार नाही. टोकाची भूमिका घेऊ; पण उर्फीला धडा शिकवू. तिच्यावर कारवाई व्हावी म्हणून मी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. आता जर उर्फीचे प्रताप थांबले नाहीत, तर तिला दिसेल तिथे थोबडणार, असा इशारा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सोमवारी दिला.

चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद ही विचित्र कपडे परिधान करून आणि अंगप्रदर्शन करून मुंबईतील रस्त्यांवर फिरत असते. त्यामुळे उर्फी जावेदरूपी स्त्रीच्या देहाचा बाजार रोखा, अशी मागणी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे केली आहे. मात्र, उर्फीने चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देताना, जोरदार टीका केल्याने चित्रा वाघ अधिकच भडकल्या आहेत. माझ्या नवीन वर्षाची सुरुवात आणखी एका पोलिसांच्या तक्रारीने झाली. या राजकारण्यांना काही कामे नाहीत का? आपल्या संविधानात असा कोणताच नियम नाही, ज्यानुसार ही लोकं मला जेलमध्ये पाठवू शकतील, असे उर्फीने म्हटले आहे.

तिच्या या वक्तव्याने चित्रा वाघ अधिकच आक्रमक झाल्या आहेत. चार भिंतींच्या आत तुम्ही उघडे-नागडे नाचा, आम्हाला काही देणे-घेणे नाही; पण ज्यावेळी सार्वजनिक ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने वागणार असाल, तर आम्ही तुम्हाला त्याच ठिकाणी प्रसाद देणार, असा इशारा उर्फीला दिला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news