Jacqueline Fernandez : जॅकलीनने विदेशात जाण्यासाठी न्यायालयाकडे मागितली परवानगी

Jacqueline Fernandez : जॅकलीनने विदेशात जाण्यासाठी न्यायालयाकडे मागितली परवानगी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ( Jacqueline Fernandez ) हिने विदेशात जाण्यासाठी परवानगी देण्याबाबतचा अर्ज दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केला आहे. जॅकलीनच्या या अर्जावर न्यायालयाने ईडीकडून उत्तर मागविले आहे. तर सदर प्रकरणावर येत्या गुरुवारी सुनावणी होणार आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणातील आरोपी महाठग सुकेश चंद्रशेखर यांच्‍याकडून मौल्‍यवान भेटवस्‍तू घेतल्‍याचा आरोप जॅकलीनवर आहे.

आपले कुटुंब बहारिनमध्ये राहत असून, त्यांना भेटण्यासाठी जाण्यास परवानगी दिली जावी, असे जॅकलीनने ( Jacqueline Fernandez ) म्हटले आहे. दरम्यान मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी स्वतः जॅकलीन न्यायालयात हजर होती.  घोटाळा प्रकरणात नाव आलेली आणखी एक अभिनेत्री नोरा फतेही हिने काही दिवसांपूर्वी जॅकलीनच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. महाठग सुकेशच्या प्रकरणात जॅकलीनने आपणास जाणूनबुजून खेचल्याचा आरोप नोरा फतेहीने केला होता.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news