

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील ३० पैकी २० ग्रामपंचायतीचे निकाल दुपारी एक वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार वीस पैकी बारा ठिकाणी भाजप तर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारल्याचे दिसून आले. दरम्यान भाजपचे नेते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने तुल्यबळ लढत दिल्याचे दिसत आहे.
भोकरदन तालुक्यातील 32 ग्रामपंचायती पैकी सर्वात प्रतिष्ठेच्या असलेल्या राजूर ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचेच भाऊसाहेब भुजंग यांच्या नेतृत्वाखालील सरपंच व पॅनल बहुमताने विजयी झाले आहेत. एकूणच दुपारपर्यंत हाती आलेले निकाल पाहता ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी नंबर एकचा पक्ष राहू शकतो, असा अंदाज आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने देखील मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेण्यात यश मिळवल्याने पुढील राजकीय समीकरणे बदलण्याची ही चिन्हे असल्याचे मतदारातून बोलल्या जात आहे.
शहरातील नगरपालिकेच्या मंगल कार्यालयात मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर साधारण दहा साडेदहा वाजता पहिला निकाल हाती आला तेव्हापासून विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांमध्ये मोठा जल्लोष दिसून येत होता. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व आमदार संतोष दानवे यांच्या निवासस्थानासमोर भव्य मंडप टाकून विजयी सरपंच व सदस्यांचे स्वागत करण्यात येत होते. मंगल कार्यालयाच्या परिसरात गुलालाची उधळण विजयाच्या घोषणांनी परिसर दुमदूमून गेला होता.
दुपारी एक वाजेपर्यंत वीस ग्रामपंचायत निकाल हाती आल्यानंतर पक्षनिहाय निकाल पुढील प्रमाणे :
करजगाव :- स्वाती गजानन लक्कस ,राष्ट्रवादी
वरुड बुद्रुक :- इंदूबाई गुलाबराव बावस्कर, भाजप
मोहळाई :-रेणुका नितीन पालकर, भाजपा
राजूर :- प्रतिभा भाऊसाहेब भुजंग, भाजप
निबोळा :- दुर्गाबाई नारायण निर्मळ, भाजप
वडशेद :-कौशल्या पंढरीनाथ आगलावे, राष्ट्रवादी
सावंगी अवघडराव :- अरबाज अब्दुल मन्नान बागवान, राष्ट्रवादी
ताडकळस :-किशोर माणिक जाधव,भाजपा
शेलूद :- शरद बारोटे,भाजपा
पळसखेडा ठोंबरी :- रंजना भानुदास काळे, भाजप
रेलगाव: कृष्णा त्र्यंबक मिसाळ, राष्ट्रवादी
पळसखेडा दाभाडी : राधिका बाबासाहेब खरात, भाजपा
नांजा /क्षीरसागर : जनार्दन मच्छिंद्रनाथ गाडेकर, भाजपा
चोऱ्हाळा/ मासनपुर : कमलाबाई संतोष लोखंडे, भाजपा
दहेड : वेणूबाई भाऊराव निकाळजे, राष्ट्रवादी
जयदेव वाडी : समाधान साहेबराव उदरभारे, भाजप
कोठा कोळी : अनिता दत्तात्रय सोनुने, राष्ट्रवादी
गव्हाण संगमेश्वर : स्वाती विशाल ढवळे ,भाजप
वालसा खालसा : सुमित्रा जाधव, राष्ट्रवादी
लतिफपुर : शशिकला भाऊराव दाभाडे, राष्ट्रवादी
हे ही वाचा :