रणवीरचे चाहत्यांकडून कौतुक | पुढारी

रणवीरचे चाहत्यांकडून कौतुक

पुढारी ऑनलाईन डेस्क : रणवीर सिंग एक हरहुन्नरी अभिनेता तर आहेच, त्याचबरोबर तो एक चांगला माणूस आहे. आता रणवीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये रणवीरच्या वर्तणुकीचे लोक कौतुक करत आहेत. नुकतेच रणवीर एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी चाहत्यांची खूप गर्दी झाली होती. यामध्ये एक मुलगा रडत होता. त्याला पाहून रणवीरने त्याला कडेवर उचलून घेतले. मालाडमध्ये झालेल्या‘सर्कस’ चित्रपटाच्या प्रमोशनला रणवीरने हजेरी लावली होती. यादरम्यान त्याने चित्रपटातील गाण्यावर डान्स केला आणि चाहतेही थिरकले. यानंतर रणवीर तेथून निघाला तेव्हा त्याला एका चिमुकल्याचा रडण्याचा आवाज आला आणि तो अचानक थांबला. त्या मुलाला रणवीरने लगेच उचलून घेतले आणि त्याला शांत केले. चिमुकल्यासाठी रणवीरचे हे वागणे चाहत्यांना आवडले असून ते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

Back to top button