

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचे स्टार किड्स नेहमीच चर्चेत असतात. त्यातलीच एक नाव म्हणजे अनन्या पांडे. ती सोशल मीडियावर सक्रिय असते. आता मात्र एका वेगळ्याच कारणाने तिने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ती अलीकडेच आयटीए अवॉर्डमध्ये बोल्ड ड्रेस घालून पोहोचली होती. अनन्याचा लूक खूपच आकर्षक होता पण गर्दीत बोल्ड ड्रेस घालणे तिला महागात पडले. अनन्याने एक लाल रंगाचा बोल्ड ड्रेस घातला होता. अनन्याने लाल रंगाचा शॉर्ट टॉप आणि गुलाबी रंगाचा हाय स्लिट स्कर्ट घातला होता. जेव्हा ती कॅमेर्यासमोर स्वतःची झलक दाखवत मीडिया फोटोग्राफर्सना फोटो देण्यासाठी पोहोचली तेव्हा तिची फजिती झाली. अनन्या जेव्हा कॅमेर्यासमोर तिची बोल्ड स्टाईल दाखवण्यासाठी पोहोचली तेव्हा तिच्या टॉपचा पट्टा घसरला. तिची स्टायलिस्ट धावत आली आणि कॅमेर्यासमोर अनन्याचा टॉप नीट करू लागली. खचाखच भरलेल्या त्या सोहळ्यात अनन्याच्या ड्रेसमुळे तिला त्रास झाला.