नवरा- नवरीपेक्षा लग्नात चर्चा फक्त काकांचीच! सोशल मीडियावर व्हिडिओ घालतोय धुमाकूळ | पुढारी

नवरा- नवरीपेक्षा लग्नात चर्चा फक्त काकांचीच! सोशल मीडियावर व्हिडिओ घालतोय धुमाकूळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या सर्वत्र लगीन घाई सुरु आहे. आपण सर्वजण मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांच्या लग्नाला हजेरी लावून त्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत असतो. त्यातच सध्या एका लग्नसोहळ्यातील भटजी बुवांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. त्या व्हायरल व्हिडीओ मध्ये भटजी बुवांची मंगलाष्टका चर्चेचा विषय बनली आहे.

लग्नात महत्वाची भूमिका ही भटजी बुवांची असते. आपण सर्वानी मराठी मंगलाष्टका ऐकल्या असतील, मात्र सध्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका मराठमोळ्या जोडप्याच्या लग्नातील आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं आहे तरी काय? असा प्रश्न पडला असेल. तर या व्हिडिओत चक्क भटजी काका इंग्रजीतून मंगलाष्टका म्हणत आहेत. शेजारील लोक भटजी बुवांकडे पाहून हसत असल्याचं दिसत आहे.

 

दरम्यान सोशल मीडियावर असे बरेच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र या काकांच्या व्हिडिओला लोकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं आहे. या मंगलाष्टकाला तिनंच दिवसात २२ लाख लोकांनी पाहिल असून १ लाख ६३ हजारच्या वर लाईक केलं आहे.

Back to top button