Hansika Motwani : हंसिकाची मेहंदी सेरेमनी, लाल रंगाच्या ड्रेसमध्ये सजली | पुढारी

Hansika Motwani : हंसिकाची मेहंदी सेरेमनी, लाल रंगाच्या ड्रेसमध्ये सजली

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील ‘शाकालका बूम बूम’ या मालिकेपासून बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटात अभिनय साकारणारी अभिनेत्री हंसिका मोटवानी ( Hansika Motwani) तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. याच दरम्यान नुकताच हंसिकाच्या मेंहदी सेरेमनीचा कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमाचे काही फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री हंसिका मोटवानी (Hansika Motwani) ला बॉयफ्रेंड सोहेल कथूरिया याने गेल्या काही दिवसापूर्वी प्रसिद्ध आयफेल टॉवरच्या समोर प्रपोज केले होतं. यानंतर दोघांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा पसरली. याच दरम्यान हंसिका आणि सोहेल दोघेजण येत्या ४ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या नुकताच दोघांचा मेहंदी सेरेमनी म्हणजे, मेहंदीची कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओज हंसिकाच्या इंन्स्टाग्रामवर पाहायला मिळत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरमधील मुंडोटा किल्ल्यावर दोघांचा मोठ्या ताटामाटात आणि शाही पद्धतीने विवाह संपन्न होणार आहे. बऱ्याच काळानंतर हे कपल लग्न बंधनात अडकणार असल्याचे चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

शेअर झालेल्या फोटोत हंसिका लाल रंगाच्या साडी आणि सोहेल मरूम रंगाच्या शेरवानीत एकदम हटके दिसला. आणखी एका फोटोत हंसिका लाल रंगाच्या चुडीदारमध्ये हाताला मेहंदी लावताना दिसतेय. तर यावेळच्या काही व्हिडिओत ती होणाऱ्या पतीसोबत आनंद लूटताना आणि डान्स करताना दिसतेय. हे व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी दोघांवर भरभरून कौतुकाचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या आहेत. याआधीही हंसिकाच्या बॅचलर पार्टीचे फोटो खूपच व्हायरल झाले होते.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री हंसिका मोटवानी छोट्या पडद्यावरील ‘शाकालका बूम बूम’ या मालिकेत पहिल्यांदा बालकलाकार म्हणून दिसली होती. यानंतर तिने बॉलिवूड आणि साऊथच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button