Malaika Arora’s Pregnancy : मलायका अरोरा प्रेग्नंट? अर्जुन कपूरचा मोठा खुलासा… | पुढारी

Malaika Arora’s Pregnancy : मलायका अरोरा प्रेग्नंट? अर्जुन कपूरचा मोठा खुलासा...

मुंबई; पुढारी ऑनलाईन : आपली स्टाईल, फिटनेस, फॅशनमुळे अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी चर्चेत असते. अभिनयामुळे कमी पण, तिच्या स्टायलीश लाईफमुळे तिला अधिक ओळखले जाते. तिने अनेक चित्रपटात आयटम साँग केले आहेत. आज सुद्धा तिचे हे साँग पाहिले जातात. अभिनेता अरबाज खानला घटस्फोट देत अभिनेता अर्जुन कपूर बरोबर असलेल्या संबधांमुळे ती गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. हे दोघेही ‘लिव्ह इन’ मध्ये राहतात, हे जग जाहीर आहे. आता या मनोरंजन जगतात मलायका अरोरा गरोदर असल्याची चर्चा सुरु आहे. (Malaika Arora’s Pregnancy)

मलायका अरोरा पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे, की मलायका अरोरा प्रेग्नंट आहे आणि ती तिच्या ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ या रिअॅलिटी शोमध्ये याची घोषणा करू शकते. तर मलायकाचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरने या वृत्तावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. (Malaika Arora’s Pregnancy)

अर्जुन कपूरने व्यक्त केली नाराजी (Malaika Arora’s Pregnancy)

बुधवारी अर्जुन कपूरने मलायकाच्या गरोदरपणाची बातमी आपल्या इन्स्टा स्टोरीवर ‘फेक गॉसिप’ म्हणून फेटाळून लावली. त्याने लिहिले की, ”हे अत्यंत खालच्या स्तराचे कृत्य आहे, जे तुम्ही निष्काळजीपणे केले आहे. असंवेदनशील आणि पूर्णपणे अनैतिक आहे. ही एक कचरा बातमी आहे. आम्ही अशा खोट्या वृत्तांकडे दुर्लक्ष करत असतो पण, माध्यमांमध्ये हे पसरवून एक प्रकारे खरे ठरविण्याचा प्रयत्न केला जातो. हे अत्यंत चुकीचे आहे. आमच्या खासगी आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करु नका”.

Malaika Arora’s Pregnancy

मलायका अरोरानेही दिली प्रतिक्रिया

मलायका अरोरानेही अर्जुनची पोस्ट शेअर केली आहे. तिने आपली नाराजी व्यक्त करत याला घृणास्पदही म्हटले आहे. खरं तर, रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता, की मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर त्यांच्या पहिल्या अपत्याची अपेक्षा करत आहेत. एंटरटेनमेंट पोर्टलने असाही दावा केला होता, की या वर्षी ऑक्टोबरमध्ये जेव्हा ते दोघे लंडनला गेले होते, तेव्हा दोघांनी आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तींना गर्भधारणेची माहिती दिली होती. (Malaika Arora’s Pregnancy)

लग्नाच्या १८ वर्षानंतर मलायका अरबाजपासून झाली वेगळी

मलायका अरोराचे पहिले लग्न अभिनेता अरबाज खानसोबत झाले होते. दोघांनी १९९८8 मध्ये लग्न केले. पण, लग्नाच्या १८ वर्षानंतर मार्च २०१६ मध्ये ते वेगळे झाले. मात्र, अरबाज आणि मलायका अनेकवेळा तिचा मुलगा अरहानसाठी एकत्र येताना दिसले आहेत. अनेकदा दोघेही आपल्या मुलाला विमानतळावर निरोप देताना दिसले आहेत. दुसरीकडे, मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करत असताना, अरबाज इटालियन मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

मलायका आणि अर्जुन कपूर यांचे आगामी प्रोजेक्ट्स

मलायका अरोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री सध्या तिच्या ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. हा रिअॅलिटी शो ५ डिसेंबर २०२२ पासून OTT प्लॅटफॉर्मवर प्रसारित होईल. या शोमध्ये मलायका अरोराच्या आयुष्याशी संबंधित अनेक पैलू लोकांसमोर सांगितले जाणार आहेत. यामध्ये त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे पाहुणे सहभागी होणार आहेत. दुसरीकडे, अर्जुन कपूरच्या पुढच्या कुट्टे या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो ‘द लेडी किलर’मध्ये भूमी पेडणेकरसोबत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)


अधिक वाचा :

Back to top button