‘KGF 2’ चे संगीत वापरल्याने राहुल गांधींविरोधात तक्रार | पुढारी

'KGF 2' चे संगीत वापरल्याने राहुल गांधींविरोधात तक्रार

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते राहुल गांधींच्या विरोधात (Rahul Gandhi) एका म्युझिक कंपनीने कॉपीराईटची तक्रार दाखल केली आहे. सध्या राहुल ‘भारत जोडो यात्रा’च्या तयारीमध्ये बिझी आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. केरळपासून सुरू झालेली यात्रा आता तेलंगणात येऊन पोहोचलीय. दरम्यान, या यात्रेच्या व्हिडिओमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, सुप्रिया श्रीनेत आणि जयराम रमेश यांच्याविरोधात एका म्युझिक कंपनीने कॉपीराइटची तक्रार दाखल केली आहे.

भारत जोडो यात्रेचा सोशल मीडियाद्वारे प्रचार सुरु आहे. या यात्रेचे व्हिडिओ करण्यात आले. यामध्ये ‘केजीएफ चॅप्टर २’ चित्रपटातील म्युझिक विना परवानगी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, एमआरटी (MRT) म्युझिक कंपनीने राहुल गांधी यांच्यावर कॉपीराईटचे उल्लंघन केल्याची तक्रार दाखल केली आहे. MRT कंपनीजवळ ‘केजीएफ चॅप्टर 2’ च्या हिंदी व्हर्जनचे अधिकार आहेत.

कंपनीने म्युझिक राईट्ससाठी मोजली होती मोठी रक्कम

आता म्युझिक कंपनीने आपल्या एका स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की, त्यांनी ‘केजीएफ चॅप्टर 2’ च्या हिंदी व्हर्जनचे अधिकार घेण्यासाठी एक मोठी किमत मोजली होती. पण, काँग्रेसने आपला राजकीय अजेंडा पुढे नेण्यासाठी विना परवानगी आमचे साऊंडट्रॅक वापरले आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button