Palak Tiwari : सलमानच नव्हे तर ‘या’ अभिनेत्यासोबत श्वेता तिवारीची मुलगी अभिनयास सज्ज | पुढारी

Palak Tiwari : सलमानच नव्हे तर 'या' अभिनेत्यासोबत श्वेता तिवारीची मुलगी अभिनयास सज्ज

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी ( Palak Tiwari ) तिच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटात खास करून पलक बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. यासोबत पलक ‘रोजी: द सैफरन चॅप्टर’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. याच दरम्यान पलकच्या हाताला आणखी एक बिग प्रोजेक्ट लागला असून, ती एका मोठ्या अभिनेत्यासोबत स्क्रिन शेअर करणार असल्याची माहिती मिळतेय.

‘रोजी: द सैफरन चॅप्टर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा पदार्पण करणारी अभिनेत्री पलक तिवारी ( Palak Tiwari )सलमान खानसोबत दिसणार आहे. या आगामी चित्रपटाचे नाव ‘किसी का भाई किसी की जान’ असे आहे. याच दरम्यान पलकला आणखी एका बिग प्रोजेक्टची ऑफर मिळाली आहे. यात पलक बॉलिवूड अभिनेता संजय दत्तसोबतच्या आगामी ‘द वर्जिन ट्री’ हा चित्रपट घेवून येत आहे. पलकचा हा तिसरा चित्रपट असून संजय दत्तसोबत अभिनय साकारण्यास सज्ज झाली आहे. या चित्रपटात पलकसोबत सनी सिंह आणि मौनी राय यांनीही मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

पलकने नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत तिच्या आगामी चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. या व्हिडीओमध्‍ये पहिल्यांदा चित्रपटातील काही  ॲक्शन सीन आणि शेवटी संजय दत्तचा भीतीदायक लूक पाहायला मिळाला आहे. यावरून पलक आगामी चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असल्याचे समजते.

केव्हा येणार पलकचा चित्रपट

पलक तिवारीचा आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपटाची रिलीज डेट बदलली असून हा चित्रपट पुढच्या वर्षी २०२३ मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात पलक आणि सलमानसोबत अभिनेत्री शहनाज गिल आणि अब्दु रोजिक दिसणार आहेत.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

Back to top button