Priyanka Chopra : प्रियांका भारतात परतली, मोरबी ब्रिज दुर्घटनेवर म्हणाली...

पुढारी ऑनलाईन डेस्क : ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) जवळपास ३ वर्षांनी भारतात परतली आहे. प्रियांकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ती मुंबई विमानतळावरून बाहेर निघताना दिसत आहे. ती भारतात येताच मोरबी ब्रिज दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केलं. तिने एक भावूक पोस्ट लिहून या घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे होवो, अशी प्रार्थना केलीय. (Priyanka Chopra)
ग्लॅमरस प्रियांका भारतात परतली
प्रियांका चोप्राचा एक एअरपोर्ट व्हिडिओ विरल भयानी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडियोमध्ये ती ब्ल्यू को-ऑर्ड आऊटफिटमध्ये दिसत आहे. देसी गर्लने व्हाईट स्नीकर्स आणि एक बॅग कॅरी केलं आहे. तिच्यासोबत तिची टीमदेखील दिसते.
मोरबी ब्रिज दुर्घटनेवर काय म्हणाली प्रियांका
प्रियांकाने आपल्या इन्स्टाग्रामवर मुंबईत येताच लिहिलं आहे- मुंबई मेरी जान. आणखी एका अन्य पोस्टमध्ये तिने मोरबी ब्रिज घटनेबद्दल लिहिलं-खूपचं हृदयद्रावक. सर्व लोकांसाठी संवेदना. गुजरातमध्ये पुलावरून पडलेले सर्व जखमी लवकर ठिक होवोत, ही प्रार्थना. माझ्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत.
प्रियांकाने आणखी एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये ती करण जोहरचा चॅट शो कॉफी विथ करणमध्ये दिसत आहे. एका फोटोला तिने कॅप्शन लिहिलंय ” अगर आप टीवी पर करण जोहर के साथ जेटलैग्ड नहीं हैं तो यह मुंबई नहीं है”.
कॉफी विथ करण पॉप्युलर शोजपैकी एक आहे, यामध्ये अनेक सेलेब्स प्रत्येक सीझनमध्ये येतात. चित्रपटांविषयी सांगायचं झालं तर टी ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसेल. यामध्ये आलिया भट्ट आणि कॅटरीना कैफसोबत दिसेल. याशिवाय ती हॉलीवूड फिल्म इट्स ऑल कमिंग बॅक टू मी मध्ये दिसणार आहे. २०२३ मध्ये हा चित्रपट रिलीज होईल. (Priyanka Chopra)
video- viralbhayani insta वरून साभार
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram