Jitendra Shastri : ‘ब्लॅक फ्रायडे’ अभिनेते जितेंद्र शास्त्री यांचे निधन | पुढारी

Jitendra Shastri : 'ब्लॅक फ्रायडे' अभिनेते जितेंद्र शास्त्री यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिनेमा जगतातील जीतू भाई नावाने प्रसिध्द अभिनेते जितेंद्र शास्त्री (Jitendra Shastri) यांचे निधन झाले. त्‍यांनी ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने एक वेगळी प्रतिमा निर्माण केली होती.

जितेंद्र शास्त्री यांनी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका साकारल्या. आपल्या दमदार अभिनयाच्‍या जाेरावर त्‍यांच्‍या अनेक भूमिका स्‍मरणीय ठरल्‍या. ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘दौड’, ‘लज्जा’, ‘चरस’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय थिएटर वर्ल्डमध्येही ते प्रसिध्द होते. तसेच त्यांनी ‘कैद-ए-हयात’, ‘सुंदरी’ यासारख्या अनेक नाटकांमध्ये काम केलं होतं. (Jitendra Shastri)

जितेंद्र यांचे मित्र आणि अभिनेते संजय मिश्रा यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवर दु:ख व्यक्त केलं. अभिनेते संजय मिश्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिलं आहे- ‘जीतू भाई आप होते तो आप कुछ ऐसा बोलते, ‘मिश्रा समटाईम क्या होता है ना कि मोबाईल में नाम रह जाता है और इंसान नेटवर्क से आऊट हो जाता है. आप इस दुनिया में नहीं रहे लेकिन मेरे दिल और दिमाग के नेटवर्क में हमेशा रहेंगे. ओम शांति.’

यशिवाय सिने आणि टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन (CINTAA) नेदेखील जितेंद्र शास्त्री यांना ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून श्रद्धांजली वाहिली आहे. सिंटाने जीतेंद्र यांचा फोटो शेअर करताना लिहिलं, ‘आपली आठवण येईल जीतेंद्र शास्त्री.’

Back to top button