रणवीर सिंह-नीरज चोप्रा गाण्यावर थिरकले

रणवीर सिंह-नीरज चोप्रा गाण्यावर थिरकले
Published on
Updated on

रणवीर सिंह चित्रविचित्र कपडे घालून वावरत असतो. त्याचा '८३' हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटात तो भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत होता. दरम्यान, एका पुरस्कार सोहळ्यामधील त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सीएनएन न्यूज १८ आयोजित पुरस्कार सोहळ्यामध्ये रणवीरला '८३' चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला. या सोहळ्याला कपिल देव, नीरज चोप्रा यांच्यासह क्रिडा विश्वातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. तसेच अन्य क्षेत्रातील मान्यवरही या कार्यक्रमाला हजर होते. कपिल देव यांच्या हस्ते रणवीरला पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्राचाही गौरव करण्यात आला. तेव्हा रणवीर सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होता. त्याने हसत "माझ्या मते, नीरज त्याच्या बायोपिकमध्ये स्वत: काम करु शकतो. नीरज चोप्रा, इन अँड अ‍ॅज नीरज चोप्रा", असे विधान केले.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत भालाफेकपटू नीरज चोप्रासह डान्स करताना तो दिसत आहे. तेव्हा रणवीरही व्यासपीठावर उपस्थित होता. नीरज त्याच्या बायोपिकमध्ये स्वत: काम करू शकतो, असे रणवीरने वक्तव्य केले. त्यानंतर त्याने नीरजला नाचायला लावले. रणवीरने नाचता-नाचता त्याला उचलून घेत मिठी मारली.

या सोहळ्याला कपिल देव, नीरज चोप्रा यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी उपस्थिती लावली होती. कपिल देव यांच्या हस्ते रणवीरला पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर नीरज चोप्रालाही गौरवण्यात आले.

कपिल देव यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याबद्दल रणवीर सिंहने केला आनंद व्यक्त

कपिल देव यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याबद्दल रणवीर सिंह याने आनंद व्यक्त केला आहे. रणवीर सिंगने '८३' या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारली होती. पुरस्कार मिळाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर लिहिले की, 'कपिल देव यांच्या हस्ते इंडियन ऑफ द इयर पुरस्कार स्वीकारणे माझ्यासाठी याहून चांगले काहीही असू शकत नाही. कपिल देव यांची भूमिका साकारल्यानंतर मला खूप प्रेम मिळाले आहे. मला यावेळी कबीर खानची आठवण झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news