रश्मिका मंधाना ब्रेकअप होऊनही मारते एक्स बॉयफ्रेंडच्या घरी चकरा | पुढारी

रश्मिका मंधाना ब्रेकअप होऊनही मारते एक्स बॉयफ्रेंडच्या घरी चकरा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘पुष्पा : द राइज’ मुळे प्रकाशात आलेली अभिनेत्री रश्मिका मंधाना आता नव्याने चर्चेत आली आहे. अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता यांच्याबरोबरील ‘गुडबाय’ चित्रपटाद्वारे रश्मिका हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. त्याच वेळी तिने आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी उघड केल्या आहेत. रेडिओ मिर्चीला दिलेल्या मुलाखतीत ती सांगते, आजसुद्धा मी माझ्या एक्स बॉयफ्रेंडला भेटते. आमच्यातील मैत्री कायम आहे. त्याच्या कुटुंबियांना भेटणे, त्यांना भेटवस्तू देणे यात काही चुकीचे आहे असे मला वाटत नाही.

विजय देवराकोंडा याच्याशी कधी काळी रश्मिकाचे नाव जोडले जात होते. नंतर तो विषय तिथेच थांबला. कारण, ‘चार्ली’ चित्रपटाचा नायक रक्षित शेट्टी याच्यासोबत रश्मिकाचे अफेअर सुरू झाले. २०१६ साली किरिक पार्टी या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची ओळख झाली. मामला एवढा पुढे सरकला की, पुढच्यात वर्षी दोघांनी साखरपुडाही करून टाकला. मात्र, नंतर कुठे तरी माशी शिंकली आणि हे नाते तुटले. एक खरे की, अजूनही रक्षितला रश्मिका विसरायला तयार नाही.

२०१७ मध्ये रश्मिकाचा झाला होता साखरपुडा

रश्मिका हिचे यापूर्वी अभिनेता रक्षित शेट्टी (Rakshit Shetty) याच्यासोबत साखरपुडा झाला होता. त्यांची २०१६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘किरिक पार्टी’ या सिनेमादरम्यान भेट झाली होती. त्यानंतर तिने अभिनेत्याला डेट करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी जुलै २०१७ मध्ये साखरपुडाही केला होता. मात्र, दोघांनी सप्टेंबर २०१८मध्ये आपला साखरपुडा मोडला. १४ महिनेच फक्त हे नाते टिकले. मात्र, त्यानंतर अचानकपणे रश्मिका आणि रक्षितचे नाते संपुष्टात आले होते. रश्मिका आणि रक्षित यांचे नाते तुटल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्काच बसला होता.

चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान रश्मिका-रक्षितच्या लव्ह स्टोरीला सुरूवात

रक्षितसोबतचे नाते तुटल्यानंतर रश्मिकावर अनेकांनी टीका केली होती. मात्र, यावर रश्मिकाने म्हटले होते की, प्रत्येक नात्याच्या दोन बाजू असतात आणि त्या दोन्ही बाजू माहीत नसताना कोणावर टीका करणे चुकीचे आहे. रक्षितसोबतच नाते संपुष्टात आल्यानंतर बऱ्याच दिवस रश्मिका डिप्रेशनमध्ये होती. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रश्मिका आणि रक्षितच्या लव्ह स्टोरीला सुरूवात झाली होती. आता रश्मिका लवकरच अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबत लग्न बंधण्यात अडकण्याची शक्यता आहे.

रश्मिका या सिनेमात झळकणार

रश्मिका आता अभिनेत्री ‘गुडबाय’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अमिताभ बच्चन, नीना गुप्ता, सुनील ग्रोव्हर आणि पावेल गुलाटी हे कलाकार दिसणार आहेत. याव्यतिरिक्त तिचे आणखी २ हिंदी सिनेमे येणार आहेत. रणबीर कपूर याच्यासोबत ती ‘ऍनिमल’ या सिनेमात झळकणार आहे, तर सिद्धार्थ मल्होत्रासोबत तिचा ‘मिशन मजनू’ हा सिनेमा येणार आहे. या व्यतिरिक्त ती पुन्हा एकदा ‘पुष्पा 2’ या सिनेमात ‘श्रीवल्ली’च्या भूमिकेत दिसणार आहे.

Back to top button