DID Super Moms : ‘सामी सामी’ गाण्यावर रश्मिकासोबत गोविंदाने धरला ठेका

DID Super Moms : ‘सामी सामी’ गाण्यावर रश्मिकासोबत गोविंदाने धरला ठेका

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'डान्स इंडिया डान्स सुपर मॉम्स' (DID Super Moms) या प्रसिद्ध कार्यक्रमाच्या तिसऱ्या सिझनचा ग्रँड फिनाले पार पडला. या कार्यक्रमात हरियाणाची वर्षा बुमरा ही डान्स इंडिया डान्स सुपर मॉम्सच्या तिसऱ्या सिझनची विजेती ठरली. 'गुड बाय' चित्रपटाची मुख्य कलाकार नीना गुप्ता आणि रश्मिका मंदाना या शोमध्ये आल्या होत्या. दोघांनी शोमध्ये खूप धमाल केली आणि चित्रपटाचे प्रमोशनही केले. या कार्यक्रमात बॉलिवूडचा हिरो नंबर १ म्हणजेच गोविंदासोबत रश्मिका डान्स करताना दिसली.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पुष्पा या चित्रपटामुळे रश्मिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. तिचा गुडबाय हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात रश्मिकासोबतच अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री नीना गुप्ता हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. सध्या या चित्रपटाची टीम चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. नुकतीच रश्मिकाने प्रमोशनसाठी 'डान्स इंडिया डान्स सुपर मॉम्स' (DID Super Moms) या स्पर्धेमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये रश्मिकाने अभिनेता गोविंदासोबत 'सामी सामी' या गाण्यावर डान्स केला.

या शोमध्ये रश्मिकाने अभिनेता गोविंदासोबत अप्रतिम डान्स केला. शोमध्ये उपस्थित ज्युरी म्हणून रेमो डिसूझा, उर्मिला मातोंडकर, भाग्यश्री या दोघांच्या डान्सवर दोघांना प्रात्साहन देताना दिसत हाेते. दोघांचा डान्स पाहून प्रेक्षकही खूश दिसले.

गोविंदा बॉलिवूडचा सर्वोत्तम डान्सर आहे. त्याने रश्मिकासोबत स्टेप बाय स्टेप डान्स केला. रश्मिकानेही गोविंदाच्या डान्सवर प्रभावित झाली. गोल्डन ड्रेसमध्ये रश्मिका नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZEE TV (@zeetv)

सामी सामी गाण्यासोबत रश्मिकानं कोरिओग्राफर रेमो डिसूचासोबत श्रीवल्ली या गाण्यावर डान्स केला. रश्मिकाच्या डान्स पाहून नीना गुप्ता आणि उर्मिला कानेटकर सुद्धा यांनी सुद्धा धमाल केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news