प्रियांका चोप्रा हिने भर कार्यक्रमात निकला स्टेजवर केले किस | पुढारी

प्रियांका चोप्रा हिने भर कार्यक्रमात निकला स्टेजवर केले किस

पुढारी ऑनलाइन डेस्क : बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी प्रियांका चोप्रा आज जागतिक स्टार बनली आहे. अभिनयासोबतच प्रियांका तिच्या सामाजिक कार्यामुळेही चर्चेत असते. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय दाम्पत्य आहे. अलीकडे असे काही घडले की ते पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या. न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये ‘ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हल’मध्ये प्रियांका चोप्रा सूत्रसंचालक होती. तिथे प्रियांकाने निकवर असलेले प्रेम पुन्हा दाखवून दिले. कार्यक्रमात प्रियांका चोप्रासोबत स्टेजवर अभिनेत्री केटी होम्स आणि अन्यही सहभागी झाले होते.

प्रियांकाने निकला स्टेजवर किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल

प्रियांका स्टेजवर येताच जोनस आणि निकला भेटली. निकने तिच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावनांना प्रत्युत्तर म्हणून प्रियांकाने स्टेजवरच निकला किस केले. प्रियांकाने केलेल्या या कृतीने सर्वजण आश्चर्यचकित झाले. यानंतर निक प्रियांकाला माईक देऊन निघून गेला. प्रियांकाने नंतर तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर त्या क्षणाचा व्हिडीओ शेअर केला. यानंतर चाहते कमेंटस् करत त्या दोघांबद्दल प्रेम व्यक्त करत आहेत.

दोघांचे प्रेम पाहून चाहते देखील आनंदी

प्रियांका आणि निकचा जो व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये प्रियांकाने एका मोठ्या कार्यक्रमात स्टेजवर गेल्यानंतर निकची किस घेतला आणि मिठी मारली. दोघांचे प्रेम पाहून चाहते देखील आनंदी झाले आहेत. शनिवारी न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये ‘ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हल’मध्ये प्रियांका चोप्रा होस्ट होती.

दरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला असून नेटकऱ्यांच्या त्यावर जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. प्रियांका चोप्राने बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे असंख्य चाहते सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्रा रंगीबेरंगी ड्रेसमध्ये मोठ्या उत्साहात ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलचे आयोजन करताना दिसत आहे. त्याचवेळी, प्रियांका चोप्राची कूल स्टाइल व्हिडिओमध्ये काळा चष्मा घालताना दिसत आहे.

प्रियांका कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय हॉलिवूड चित्रपट ‘सिटाडेल’ आणि अभिनेता अँथनी मॅकीसोबतचा ॲक्शन फिल्म ‘एंडिंग थिंग्ज’ देखील प्रियांकाकडे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jerry x Mimi 😍 (@jerryxmimi)

 

Back to top button