तिकीटबारीवर ‘बॉईज 3’ चा धुमाकूळ | पुढारी

तिकीटबारीवर ‘बॉईज 3’ चा धुमाकूळ

प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असलेला व बहुचर्चित असा बॉईज 3 हा चित्रपट एक आठवड्यापूर्वी प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा धैर्या, ढुंग्या आणि कबीरने अवघ्या महाराष्ट्रात धमाका केला. यावेळी या त्रिकुटाला साथ दिली ती बिनधास्त अशा कीर्तीने. अवधूत गुप्ते प्रस्तुत, विशाल देवरुखकर दिग्दर्शित बॉईज 3 या चित्रपटाला महाराष्ट्रभरात कमालीचा प्रतिसाद मिळतोय.

चित्रपट प्रदर्शित होऊन आता एक आठवडा झाला असून बॉक्स ऑफिसवर ‘बॉईज 3’ने 4.96 करोडची कमाई केली आहे. एकदंरच सध्याचे चित्र पाहता या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर असे अनेक मजबूत वीकेंड मिळण्याची अपेक्षा आहे. तरुणांमध्ये ‘बॉईज 3’ची भलतीच क्रेझ दिसत असून चित्रपटगृहांमध्ये याचे शोजही वाढवण्यात आले आहेत. तरुणांसोबतच कुटुंबीयही हा चित्रपट एन्जॉय करत आहेत. डायलॉगपासून गाण्यांपर्यंत सगळ्यांनाच प्रेक्षकांच्या टाळ्या-शिट्ट्या ऐकायला मिळत आहेत.

Back to top button