पुढारी ऑनलाईन डेस्क : 'कबुल है', इश्कबाज, तेनाली राजा, यासारख्या अनेक सिरियल्समध्ये काम केलेल्या अभिनेत्री निशी सिंह यांचे निधन झाले. कित्येक दिवसांपासून आजारी असलेल्या या अभिनेत्रीचे रविवारी दुपारी निधन झाले. नुकताच त्यांचा ५० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. (Nishi Singh)
निशा सिंह यांचे पति संजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनूसार, त्यांना पक्षघाताचा झटका आला होता. तेव्हापासून त्यांची प्रकृती बिघडली होती. ३ फेब्रुवारी रोजी आलेल्या दुसऱ्या स्ट्रोकनंतर काही दिवस त्यांची प्रकृती स्थिर राहीली होती. मे मध्ये पुन्हा त्यांची प्रकृती खालावली यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल ११० दिवसांनंतर परवा रात्री (दि. १६) त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. पण १७ सप्टेंबरच्या रात्री त्यांची प्रकृती बिघडल्याने पुन्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर रविवारी (१८ सप्टेंबर) दुपारी तीनच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
१६ सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी संजय यांच्याजवळ लाडू खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांच्या आवडीचे बेसनचे लाडू संजय यांनी त्यांना खाऊ घातले. त्यानंतर दुपारनंतर त्यांची प्रकृती ठीक होती. चार वर्षांपासून पक्षघाताच्या आजाराशी त्या झुंज देत होत्या. त्यांच्या या निधन वार्ताने अनेक कलाकार दु:ख व्यक्त करत आहेत.
हेही वाचा