

बॉलीवूडमधील ए लिस्टेड कलाकारांच्या मानधनाचे आकडे खूप मोठे असतात, पण चरित्र भूमिका साकारणारे इंडस्ट्रीतील काही ज्येष्ठ कलाकारही चांगली कमाई करतात. भूमिकेच्या लांबीच्या तुलनेत या कलाकारांची कमाई मोठी असते. अशा कलाकारांच्या मानधनावर एक नजर…
अमिताभ बच्चन यांना त्यांच्या सध्याच्या वयातही खूप चांगल्या भूमिका मिळतात. नुकतेच 'ब—ह्मास्त्र'मधील भूमिकेसाठी अमिताभ यांना 10 कोटी रुपये मिळाले होते.
वरुण धवन-कियारा आडवाणीच्या 'जुग जुग जियो'मधील भूमिकेसाठी अनिल कपूरने 2 कोटी रुपये मोबदला घेतला होता. तर याच चित्रपटासाठी नीतू कपूर यांना सव्वा कोटी रुपये मिळाले होते.
धर्मेंद्र हे लवकरच आलिया भट्ट आणि रणवीर कपूर यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये दिसणार आहेत. त्यासाठी त्यांना 5 कोटी रुपये दिले गेले आहेत. यात त्यांच्यासोबत शबाना आझमी आणि जया बच्चन देखील आहेत.
'गहराईया'मधील भूमिकेसाठी नसीरुद्दीन शाह यांना 45 लाख रुपये दिले गेले होते. तर त्यांची पत्नी अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांना 'जयेशभाई जोरदार' मधील भूमिकेसाठी 1 कोटी रुपये मानधन मिळाले होते.
दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांचा हुकमी एक्का असलेले अभिनेते बोमन ईराणी यांनी 'जयेशभाई जोरदार'मधील भूमिकेसाठी 2 कोटी रुपये मानधन घेतले होते.