नीतू कपूर : 'कपूर कुटुंबीय वरून रूबाबदार आणि आतून पोकळ बांबू' | पुढारी

नीतू कपूर : 'कपूर कुटुंबीय वरून रूबाबदार आणि आतून पोकळ बांबू'

मुंबई; पुढारी ऑनलाईन: बॉलिवूड दिग्गज अभिनेत्री नीतू कपूर नुकतेच ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सहभागी झाली आहे. या कार्यक्रमात तिने कपूर कुटुंबातील सदस्यांना खोटा अहंकार असल्याचा खुलासा केला आहे. या शोमध्ये नीतू कपूरसोबत तिची मुलगी रिद्धिमा साहनी दिसणार आहे.

सोनी टिव्हिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘द कपिल शर्मा शो’ ची एक झलक शेअर केली आहे. यावेळी नीतू कपूर आणि कपिल शर्मा कपूर कुटुंबाबद्दल चर्चा करताना दिसले.

या चर्चेवेळी बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांची पत्नी नीतूने सांगितले आहे की, ‘कपूर कुटुंबिय सगळे बोगस अंहकार बाळगत आहेत. तसेच त्याच्या प्रत्येकात खोटा अहंकार असून ते वरून रूबाबदार आणि आतून पोकळ बांबू असल्याचे म्हटले आहे.

याच दरम्यान नीतू यांची मुलगी रिद्धिमाला हे ऐकूनच धक्का बसतो. यानंतर मात्र, या शोमधील कपिल आणि अर्चना पूरन सिंहसोबत सर्वजण एकत्रितपणे जोरजोरात हसतात.

याच दरम्यान आणखी एका एपिसोडचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. यात कपिलने त्या दिवसांची आठवण काढली जेव्हा प्रोडक्शन टीमने ऋषी कपूर यांना आमंत्रित केले होते आणि नीतू कपूरला सोबत घेऊन येण्याची विनंती केली होती.

मग मला कशाला फोन करता

या घटनेची माहिती सांगताना कपिल शर्मा म्हणाला की, ऋषी कपूर यांना आम्हाला एका कार्यक्रमाला आमंत्रित करायचे होते. आणि त्याच्यासोबत नीतू कपूर यांना देखील सोबत घेवून येण्याची विनंती करायची होती. यावेळी त्यांना हे सांगणे कठीण होतं. तेव्हा प्रॉडक्शन टीमने ऋषी यांना फोन करून नीतू कपूरला सोबत घेवून यायला हवे असे म्हटल्यावर ऋषी हे म्हणाले की, ‘ मग तिलाच फोन करा.’

यानंतर टिमने नीतू यांना रात्री १० वाजता फोन करून आमंत्रित केले. आणि यावेळी त्यांनी ऋषी कपूर तुमच्यासोबत नाहीत का? या प्रश्नाच उत्तर देताना नीतू म्हणाल्या, ‘माझ्यासोबत नसतील तर ते कुठे असतील?’

यानंतर नीतू आणि ऋषी कपूर २०१७ मध्ये ‘खुल्लम खुल्ला’ या आत्मचरित्राच्या प्रमोशनसाठी कॉमेडी शोच्या सेटवर आले होते. आज ऋषी कपूर यांच्या जयंतीनिमित्त हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या घडलेल्या घटनेवरून ऋषी आणि नीतू कपूरसोबत सर्वाच्यात खूपच अंहकार ठासून भरला असल्याचे दिसून येते. याशिवाय आता स्वत: नीतू यांनी या गोष्टीची कपिल शर्मा शामध्ये खूलासा केला आहे.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button