Emergency: ‘इमरजन्सी’मध्ये संजय गांधींची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता

vishak nair
vishak nair

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सध्या तिच्या बहुप्रतिक्षित 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात कंगना राणौत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. इंडस्ट्रीतील अनेक कलाकारही वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातून आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांचे लूक समोर आले आहेत. आता संजय गांधी यांची भूमिका साकारणारा अभिनेता विशाक नायरचाही लूक आता रिलीज झाला आहे.

कंगना राणौतने काही वेळापूर्वीच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून विशाक नायरचा लूक शेअर केलाय. मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार विशाक नायर या चित्रपटात संजय गांधींची महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. विशाकच्या या लुकमध्ये तो चष्मा घातलेला दिसत आहे.

'इमर्जन्सी'मधला विशाक नायरचा लूक शेअर करताना कंगणा रणौतने लिहिले, 'संजय गांधींच्या रूपात विशाक नायरच्या टॅलेंटची ओळख करून देत आहोत. संजय गांधी, जो इंदिराजींचा आत्मा होता, ज्यांच्यावर तिने प्रेम केले आणि नंतर गमावले.' पोस्ट शेअर करताना विशाकने असेही लिहिले की, 'संजय गांधींची भूमिका साकारण्याचा मान मिळाला. कंगना राणौत दिग्दर्शित या अद्भुत टीमचा आणि या चित्रपटाचा एक भाग असल्याने मला आनंद होत आहे.'

'इमर्जन्सी'पूर्वी मिलिंद सोमण, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे आणि अनुपम खेर यांचा लूक समोर आला आहे. या चित्रपटात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत श्रेयस तळपदे, जय प्रकाश नारायण यांच्या भूमिकेत अनुपम खेर, फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या भूमिकेत मिलिंद सोमण आहेत. कंगना राणौत या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vishak Nair (@nair.vishak)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news