स्टार प्रवाहच्या ‘आता होऊ दे धिंगाणा’चे सूत्रसंचालन करणार सिद्धार्थ जाधव | पुढारी

स्टार प्रवाहच्या ‘आता होऊ दे धिंगाणा’चे सूत्रसंचालन करणार सिद्धार्थ जाधव

मुंबई ः स्टार प्रवाह वाहिनी 10 सप्टेंबरपासून भेटीला घेऊन येतेय एक भन्‍नाट कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा.’ जेव्हा जेव्हा कुटुंब एकत्र येतं आणि विसाव्याचे काही क्षण मिळतात तेव्हा अंताक्षरी रंगल्याशिवाय राहत नाही. हा कार्यक्रम म्हणजे अंताक्षरीचा भन्‍नाट प्रयोग म्हणता येईल. ‘मराठी परंपरा, मराठी प्रवाह’ हे ब—ीद जपणार्‍या स्टार प्रवाहच्या या नव्या कार्यक्रमातही मराठी गाण्यांचा आस्वाद घेता येईल. स्टार प्रवाह परिवारातल्या दोन मालिकांच्या टीममध्ये ही अनोखी सांगीतिक लढत रंगणार आहे; पण हा नुसता म्युझिकल कार्यक्रम नाही, तर बरेच भन्‍नाट टास्क आणि कलाकारांच्या पडद्यामागच्या गमती-जमती या मंचावर उलगडतील.

सर्वांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार असून, तब्बल 11 वर्षांनंतर तो स्टार प्रवाहसोबत पुन्हा जोडला जातोय. सिद्धार्थ म्हणाला की, प्रेक्षकांचे वेगवेगळ्या पद्धतीने मनोरंजन करायला मला आवडते. यातल्या काही गोष्टी प्रेक्षकांना नवं सरप्राईज देतील. प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की, आपली छाप पाडणारा एक कार्यक्रम असावा. हा कार्यक्रम त्याच धाटणीचा आहे. तेव्हा पाहायला विसरू नका, स्टार प्रवाहचा हा अनोखा आणि भन्‍नाट कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा’ 10 सप्टेंबरपासून दर शनिवार आणि रविवार रात्री 9 वाजता फक्‍त स्टार प्रवाहवर.

Back to top button