

पुढारी ऑनलाईन : प्रियांका चोप्रा अॅमेझॉन प्राईमच्या 'सिटाडेल' या वेब सिरीज (Citadel Web Series) माध्यमातून ओटीटीमध्ये पदार्पण करत आहे. या वेब सीरिजमध्ये प्रियांकाचा अॅक्शन अवतार पहायला मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सिरीजचे निर्माते रुसो ब्रदर्स आहेत, जे अॅव्हेंजर्ससारख्या चित्रपटासाठी ओळखले जातात. आता 'सिटाडेल' बद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे की ही वेब सिरीज ओव्हर बजेट झाली आहे. 'द रिंग्ज ऑफ पॉवर'नंतर 'सिटाडेल' ही प्राइमची सर्वात महागडी मालिका ठरल्याचे बोलले जात आहे.
देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही सध्या हॉलीवूडमध्ये चांगलीच रमली आहे. प्रियांकाच्या 'सिटाडेल'या आगामी सायफाय वेबसीरिजची गेल्या काही काळापासून चर्चा आहे. एकतर या सीरिजचे दिग्दर्शन 'अॅव्हेंजर्स एंडगेम'चे रुसो ब्रदर्स करत आहेत. शिवाय यात प्रियांकासोबत अभिनेता रिचर्ड मॅडेन आहे आणि आता या सीरिजचे बजेट जवळपास 2000 कोटी रुपये झाल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे ही वेबसीरिज (Citadel Web Series) अॅमेझॉन प्राईमची दुसरी सर्वाधिक महागडी वेबसीरिज ठरली आहे. दरम्यान, या सीरिजची क्रिएटिव्ह टीम बाहेर पडल्याने याचे शूटिंग पुन्हा एकदा केले जाणार आहे. त्यामुळे सीरिजचे बजेट दुप्पट झाले आहे. पहिल्या शूटिंगसाठी 160 मिलियन डॉलर लागले होते. दुसर्यांदा शूटिंग केल्याने 75 मिलियन डॉलर अधिक लागले. 200 मिलियन डॉलरच्या पुढे बजेट गेले.
प्रियांकाने 2021 मध्ये सिटाडेलचे शूटिंग सुरू झाल्याची माहिती एक फोटो शेअर करून दिली होती ज्यामध्ये तिचा चेहरा चिखलात माखलेला दिसत आहे.
यानंतर मे महिन्यात तिने आणखी एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये फोटोमध्ये प्रियांकाचा चेहरा रक्ताने माखलेला दिसत आहे. या फोटोमध्ये तिला दुखापत झाल्याचे दिसते. यासोबत प्रियांकाने लिहिले की, तुम्हालाही कामाच्या ठिकाणी अशा अडचणींचा सामना करावा लागला आहे का? प्रियांका यापूर्वी अमेरिकन टीव्ही शो QUANTICO मध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती. ही देखील एक अॅक्शन मालिका होती आणि यात प्रियांकाने खास एजंटची भूमिका केली होती.