जान्हवी कपूरसाठी सोलापूरकरांचा ‘जीव येडा पिसा’, चाहत्यांनी 3 दिवसांसाठी पूर्ण थिएटरच केले बूक

जान्हवी कपूरसाठी सोलापूरकरांचा ‘जीव येडा पिसा’, चाहत्यांनी 3 दिवसांसाठी पूर्ण थिएटरच केले बूक
Published on
Updated on

पुढारी ऑनलईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग आहे. जान्हवी कपूर ही कायमच चर्चेत असते. अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या जोरदार चर्चेत आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांचा 'मिस्टर अँण्ड मिसेस माही' हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जान्हवी कपूर आता आपल्या एका चाहत्यामुळे चर्चेत आली आहे.

सोलापूरमधील चाहत्यांनी चित्रपटगृह तीन दिवसासाठी केले बुक

जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. जान्हवीने सैराटचा हिंदी रिमेक असलेल्या धडकमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आता राजकुमार राव सोबत तिची मु्ख्य भूमिका असलेला 'मिस्टर अँण्ड मिसेस माही' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सोलापूरमधील जान्हवी कपूरच्या चाहत्यांनी तब्बल तीन दिवस थिएटर बुक केले आहे. मिस्टर अँण्ड मिसेस माही हा चित्रपट लोकांना मोफत दाखवण्यात येणार आहे.

6 लाख रुपये खर्च करत 18 शो बुक

आता चक्क सोलापुरातील जान्हवी कपूरच्या चाहत्यांनी 3 दिवसाचे 18 शो बुक केले आहेत. सोलापुरातील नागरिकांना 3 दिवस आता मिस्टर अँड मिसेस माही हा चित्रपट फ्रीमध्ये बघायला मिळणार आहे. जान्हवी कपूरच्या मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटासाठी 6 लाख रुपये खर्च करत 18 शो चाहत्याने चक्क बुक केले आहेत.

आश्रम शाळा, अनाथ व वंचित मुलांना चित्रपट मोफत

धर्मराज गुंडे , तन्वीर शेख यांच्या ग्रुपने थिएटरमधील तीन दिवसांचे एकूण 18 शो पूर्णपणे बुक केले आहेत. या तीन दिवसांत सोलापुरातील आश्रम शाळा, अनाथ आणि वंचित मुलांना सांभाळणाऱ्या संस्था, गरीब महिला यांना हे चित्रपट मोफत दाखवण्यात येणार आहेत. या चित्रपटाची 5 हजार तिकीट मोफत देण्यात आली आहेत. लोकांना या चित्रपटातून प्रेरणा मिळावी व आपल्या आवडत्या अभिनेत्रीसाठी चाहत्यांनी हा उपक्रम राबवला असल्याचे धर्मराज गुंड यांनी सांगितले. आपल्या आवडत्या अभिनेता आणि अभिनेत्रीसाठी चाहते काय करू शकतात, याचेच हे उदाहरण आहे.

काय आहे मिस्टर अँड मिसेसची कहाणी?

'मिस्टर अँड मिसेस माही' एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. क्रिकेटच्या प्रति राजकुमारची जिद्द आणि प्रेमासाठी मैदानात उतरलेली जान्हवीची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडलीय. महेंद्र असे राजकुमारच्या भूमिकेचे नाव असून बालपणापासून क्रिकेटर बनण्याचे स्वप्न असते. पण, तो आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाही. पण, महेंद्रचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महिमा (जान्हवी) मैदानात उतरते. पेशाने डॉक्टर महिमा आपल्या पतीचे स्वप्न पूर्ण करायचं ठरवते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news