बॉडीगार्ड: विराट-अनुष्का यांचा बॉडीगार्ड कोण आहे? मिळतो ‘इतका’ पगार | पुढारी

बॉडीगार्ड: विराट-अनुष्का यांचा बॉडीगार्ड कोण आहे? मिळतो ‘इतका’ पगार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : विराट-अनुष्का यांचा वैयक्तिक बॉडीगार्ड आहे, हा बॉडीगार्ड अनेक वर्षांपासून अनुष्का शर्माच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडत आहे.

बॉलिवूडचे स्टार्स फॅन फॉलोइंग एन्जॉय करत असतात. अशातच जेव्हा-केव्हा स्टार्स बाहेर येतात तेव्हा लोकं त्यांना पाहण्यासाठी, भेटण्यासाठी गर्दी करतात. स्टार्सच्या मागे-पुढे चाहत्यांची अक्षरश: रीघ लागलेली असते. अशा वातावरणात आपल्या सुरक्षा लक्षात घेऊन सर्व स्टार्स वैयक्तीक बॉडीगार्ड आपल्या सोबत ठेवतात. मोठे-मोठे स्टार्स आपल्या बॉडीगार्ड्सना भरभक्कम पगारही देतात.

अनुष्का शर्माकडे तिचा वैयक्तिक बॉडीगार्ड आहे, ज्याचे नाव सोनू आहे. सोनूचे खरे नाव प्रकाश सिंह आहे. प्रकाश अनेक वर्षांपासून अनुष्का शर्माच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडत आहे. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीशी लग्न करण्यापूर्वीही प्रकाश अनुष्का शर्मासोबत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

सूत्रांच्या माहितीनुसार, स्वत:च्या सुरक्षेसाठी अनुष्का शर्मा कोट्यवधीची रक्कम आपला बॉडीगार्ड ​​सोनूला देते. अनुष्का तिचा बॉडीगार्ड सोनूला वर्षाला १.२ कोटी रुपये देते. एकाद्या मोठ्या कंपनीच्या सीईओला एवढी भली मोठी रक्कम मिळत असते.

Know what is the name of Anuhska Sharma's bodyguard, know how much salary Mrs. Kohli pays - Movie Reviews Tamil Cinema Reviews Bollywood Gossip

सोनू केवळ अनुष्का आणि विराट कोहलीचा अंगरक्षक नाही. विरुष्का सोनूला तिच्या कुटुंबातील सदस्य मानतात. अनुष्का दरवर्षी सोनूचा वाढदिवस साजरा करते. २०१८ मध्ये अनुष्काने तिच्या बॉडीगार्डचा वाढदिवस ‘झिरो’ चित्रपटाच्या सेटवर साजरा केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

बॉडीगार्ड सोनू अनुष्कासोबतच विराट कोहलीच्या सुरक्षेची जबाबदारी संरक्षणही करतो. सार्वजनिक ठिकाणी वावरताना सोनू विराटच्या सुरक्षेसाठी नेहमीच त्याच्या सोबत असतो. विराटची स्वतःची सुरक्षा टीम देखील आहे. असे असले तरी विराटचा सोनूवर विश्वास ठेवतो.

अनुष्का शर्मा, विराट कोहली

एवढेच नाही तर अनुष्का शर्माच्या गरोदरपणातही तिच्या सुरक्षेची जबाबदारी सोनूवर होती. अनुष्का शर्मा गरोदरपणात काम करत होती. अशा स्थितीत सोनू अनुष्काला तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन सोडणे, बाहेर आणणे या कामात व्यस्त होता. पीपीई किट परिधान करून सावली प्रमाणे सोनू अनुष्काची सोबत करत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

Back to top button