‘शेरशाह’च्या या जोडीचा रिल होतो आहे व्हायरल, दिले रिलेशनशीपचे संकेत ?

‘शेरशाह’च्या या जोडीचा रिल होतो आहे व्हायरल, दिले रिलेशनशीपचे संकेत ?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडमध्ये काही जोड्या नव्याने बनत जातात तर काही कायमस्वरूपी एकमेकांपासून फारकत घेतात. अर्थात चाहत्यांचही सेलिब्रिटींच्या या लिंक अप – ब्रेक अपकडे आवर्जून लक्ष असते. बॉलीवूडमधील काही जोड्या आपल नात अगदी खुलेपणाने स्वीकारतात. तर काही जोड्या नातं लपवत त्याबाबत केल्या जाणार्‍या गॉसिपची मजा घेतात.

अशीच एक जोडी आहे कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची. या जोडीला प्रेक्षकांचं प्रेम भरपूर मिळालं आहे. या जोडीच्या रिलेशनशीपबाबत अनेक चर्चा होताना दिसतात. पण नात्याबाबत होणारं प्रत्येक गॉसिप ही जोडी गोड हसून टाळताना दिसते. या जोडीची गोड केमिस्ट्री दिसून आली ती शेरशाह सिनेमावेळी. जिगरबाज कॅप्टन विक्रम बत्राच्या आयुष्यावर आलेल्या सिनेमात कियारा त्यांची प्रेयसी डिंपल चीमा यांच्या व्यक्तिरेखेत दिसली होती. या जोडीला सिनेमात प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. आताही ही जोडी आणि त्यांच्या नात्याची चर्चा होऊ लागली आहे. याला कारण आहे त्यांनी नुकताच शेअर केलेला रील.

सुपरहीट सिनेमा शेरशाह सिनेमाने नुकतच एक वर्ष पूर्ण केलं. या निमित्ताने ही जोडी लाईव्ह आली होती. त्यावेळी बरेच खुमासदार किस्से या दोघांनी शेअर केले. यावेळी सिद्धार्थ म्हणतो की 'कियारासोबत असलेला कोणताही प्रवास माझ्यासाठी आनंददायी असतो'. हे ऐकताच कियारा लाजते. यावर त्याला उत्तर देताना कियारा म्हणते 'असं काही नाही आपण दोघही कामात बिझी होतो'. तर मला मनातून असं वाटत होत हे म्हणत सिद्धार्थने एक प्रकारे त्यांच्या रिलेशनशीपवर शिक्कामोर्तब केल्याचं बोललं जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news