कॉलेजमध्ये असताना कोणी तुम्हाला प्रपोज केलंय का? पंकजा मुंडेंनी दिलं भन्नाट उत्तर | पुढारी

कॉलेजमध्ये असताना कोणी तुम्हाला प्रपोज केलंय का? पंकजा मुंडेंनी दिलं भन्नाट उत्तर

पुढारी ऑनलाईन: भाजप नेत्या आणि माजी पंकजा मुंडे या झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात नुकत्याच सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमादरम्यान, पंकजा मुंडे यांनी विचारलेल्या अनेक अनेक प्रश्नांना एकदम मोकळेपणाने उत्तरं दिली. याच कार्यक्रमादरम्यान मुंडे यांना तुम्हाला कोणी प्रपोज केलंय का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर पंकजा यांनी एकदम भन्नाट उत्तर दिलं.

उत्तर देताना त्या म्हणाल्या की, “मी जेव्हा कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते, तेव्हा माझे वडील गोपीनाथ मुंडे हे राज्याचे गृहमंत्री होते. ते गृहमंत्री असल्यामुळे माझ्यासोबत भरपूर सिक्युरिटी असायची. सिक्युरिटी पाहून अनेक लोक माझ्याशी बोलायला घाबरायचे. पण त्यानंतर एकदा कज कुणाशी मैत्री झाली की झाली, मग ती कायम टिकली आहे”. यावेळी पंकजा मुंडे यांना तुम्हाला कोणी प्रपोज केलंय का? असा प्रश्नही अँकरकडून विचारण्यात आला. त्यावर आपल्याला कोणी प्रपोजच केलं नाही, हा सुखद अनुभव आपल्याला अनुभुवयाला मिळाला नाही, असंही त्यांनी सांगितलं.

या कार्यक्रमात पंकजा यांनी आपण विरोधी पक्षातील नेत्यांनाही फोडलं असल्याचं त्या म्हणाल्या. “कायम बेरजेचं राजकारण करायचं, वजाबाकीचं नाही, असं बाबा मला नेहमी सांगायचे. यामुळे इतर पक्षांत चांगलं काम करणाऱ्या अनेक लोकांना मी फोडलंय,” असं पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

Back to top button