आधी बॉलीवूडविषयी वादग्रस्त वक्तव्य आणि आता पदार्पणाची तयारी! | पुढारी

आधी बॉलीवूडविषयी वादग्रस्त वक्तव्य आणि आता पदार्पणाची तयारी!

मुंबई : तेलगू सुपरस्टार महेशबाबू याने काही महिन्यांपूर्वी बॉलीवूडबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याला बॉलीवूड फिल्म करण्याबाबत प्रश्न विचारल्यावर महेश म्हणाला होता की, ‘मला हिंदीतून अनेक ऑफर्स मिळत आहेत; पण बॉलीवूड मला अफॉर्ड करू शकत नाही. मला जो सन्मान दाक्षिणात्य इंडस्ट्रीत मिळतो तितका पुरेसा आहे. मी माझी इंडस्ट्री सोडून दुसर्‍या इंडस्ट्रीत जाण्याचा विचार करू शकत नाही.’

तथापि, आता महेशबाबू स्वतःच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या चित्रपटातून महेशबाबू हिंदीत येत आहे. महेशबाबूचा लेटेस्ट ‘सरकारू वारी पाटा’हा चित्रपट हिंदीत रीलिज करण्यात आला नव्हता. महेशबाबू आणि राजामौली यांनी गतवर्षी एकत्र येत असल्याची घोषणा केली होती. हा पॅन इंडिया चित्रपट असणार आहे. या वर्षाखेरपर्यंत चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होऊ शकते. चित्रपटाविषयी अधिक माहिती समोर आलेली नाही.

Back to top button