vijay-rashmika : एंगेजमेंट तुटल्यानंतर विजयशी डेटिंग; पण सध्या दोघेही सिंगल..! | पुढारी

vijay-rashmika : एंगेजमेंट तुटल्यानंतर विजयशी डेटिंग; पण सध्या दोघेही सिंगल..!

जेव्हापासून ‘लायगर’च्या प्रमोशनमध्ये अभिनेता विजय देवरकोंडाने अभिनेत्री रश्मिका मंदानाचे कौतुक केले तेव्हापासून पुन्हा विजय-रश्मिकाच्या डेटिंगच्या चर्चांना ऊत आला आहे; पण रश्मिकाची एंगेजमेंट तुटल्यानंतर रश्मिका आणि विजय एकमेकांना डेट करत होते. पण, दोन वर्षांपूर्वीच त्यांच्यातील रिलेशनशिप संपुष्टात आली आहे.

दाक्षिणात्य अभिनेता रक्षित शेट्टी आणि रश्मिका हे ‘किरिक पार्टी’या चित्रपटाच्या शूटिंगवेळी एकमेकांवर प्रेम करू लागले होते. त्यानंतर 2017 मध्ये दोघांचा साखरपुडाही झाला होता. काही कारणांनी साखरपुडा मोडला. याच काळात विजय आणि रश्मिका यांनी ‘गीता गोविंदम’ (2018) आणि ‘डीअर कॉम्रेड’ (2019) या चित्रपटांत काम केले होते. त्यामुळे रश्मिका आणि विजय एकमेकांच्या जवळ आले होते. दोघे एकमेकांना डेट करत होते; पण दोन वर्षांपूर्वी त्यांनी ब्रेकअप केले. ब्रेकअपचे कारण समोर आलेले नाही. तेव्हापासून रश्मिका सिंगलच आहे; पण आता दोघांमध्ये कोणतीही रोमँटिक केमिस्ट्री नाही, तर दोघेही एकमेकांचे केवळ चांगले मित्र आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत विजय म्हणाला होता की, ‘रश्मिका इज अ डार्लिंग.’ त्यापूर्वी त्याने ती खूप प्रेमळ आणि सुंदर आहे, असे म्हटले होते.

Back to top button