सिंगल अँड हॅप्पी | पुढारी

सिंगल अँड हॅप्पी

बॉलीवूड कलाकार कुणाला डेट करताहेत, त्यांचे वैवाहिक आयुष्य कसे आहे, याविषयी लोकांना मोठी उत्सुकता असते; पण ‘बी टाऊन’मध्ये असेही अनेक लोक आहेत ज्यांनी अद्याप संसार थाटलेला नाही आणि यापुढील काळात ते संसार थाटतील, याची शक्यता कमीच आहे. कोण आहेत असे सिंगल अँड हॅपी कलाकार, याविषयी…

सलमान खान : यात सर्वात मोठे नाव आहे सलमान खान. सलमान आणि त्याच्या दरवेळी नव्या गर्लफ्रेंडची चर्चा नेहमीच होत असते. तथापि, सलमानने म्हटले होते की, त्याला लग्‍नात इंटरेस्ट नाही. सिंगल आहे तेच बरे आहे. तुम्हाला अंदाज नाही, मी किती खूश आहे.

तब्बू : तब्बू म्हणते की, एकेकाळी सिंगल हा शब्द वाईट मानला जात होता. पण, आता तसे नाही. तुमच्या आनंदाची अनेक कारणे असू शकतात. चुकीच्या पार्टनरसोबत राहावे लागले, तर ते एकटेपणापेक्षा भयानक असेल.

अक्षय खन्ना : अक्षय खन्‍नानेही तो नेहमी अविवाहित राहील, असे सांगितले होते. मी डेट करू शकतो; पण नेहमी सोबत राहू शकत नाही आणि मला असेच जगायचे आहे, असे त्याने म्हटले होते.

तुषार कपूर : तुषार कपूरदेखील सिंगल असून तो सरोगसीद्वारे बाप बनला आहे. मी आनंदी आहे, मुलाला वेळ देतो. इतर कुणासाठी वेळ द्यावा लागत नाही, असे त्याचे म्हणणे आहे.
अमिषा पटेल : मी सिंगलच खूश आहे. सध्या तरी मला रिलेशनशिपमध्ये काहीही इंटरेस्ट नाही, असे अमिषा म्हणते.

Back to top button