योहानीचा मास्टर प्लॅन | पुढारी

योहानीचा मास्टर प्लॅन

‘मानिका मागे हिते…’ या गाण्यामुळे एका रात्रीत इंटरनेट सेन्सेशन बनलेली श्रीलंकन गायिका योहानी आता बॉलीवूडच्या वाटेवर आहे. बॉलीवूडमध्ये एंट्रीचा तिने मास्टर प्लॅनच केला आहे. एका मुलाखतीत तिने याबाबत माहिती दिली. योहानी म्हणाली की, मी आता मुंबईत आले आहे आणि हिंदी शिकत आहे. त्यासाठी तिने दोन शिक्षक लावले आहेत.

हिंदी शिकण्यासाठी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिला काही टीप्स देत आहे. जॅकलिनदेखील श्रीलंकेची असून ती आता बॉलीवूडमधील एक प्रमुख हिरोईन बनली आहे. मुंबईत येण्याआधीही योहानीने जॅकलिनचा सल्ला घेतला होता. सध्या तिचे पूर्ण लक्ष हिंदी शिकण्यावर आहे. जेणेकरून भविष्यात हिंदी गाणी गाण्यात तिला अडचण भासू नये.

गायिका नेहा कक्‍कर आणि रॅपर बादशाह यांच्यासोबत काम करण्याची इच्छा योहानीने व्यक्‍त केली आहे. याशिवाय ‘गली बॉय’मध्ये रणवीरचे रॅप पाहून ती इम्प्रेस झाली होती. त्यामुळे रणवीर सिंग सोबत तिला रॅप गाणे रेकॉर्ड करण्याची इच्छा आहे. याशिवाय तिला आलिया भट्ट खूप आवडते. दरम्यान, योहानी अजय देवगणच्या एका चित्रपटात तिचे ‘मानिका मागे हिते’ हे गाणे गाताना दिसणार आहे.

Back to top button