सायली संजीव
Latest
६८ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : सायली संजीवच्या ‘गोष्ट एका पैठणी’ची सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
पुढारी ऑनलाईन डेस्क : ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून आज ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा होणार आहे. दरवर्षी हा पुरस्कार देशातील निवडक सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि प्रतिभावंत कलाकारांना दिला जातो. पुरस्काराची घोषणा सुरू झाली असून थोड्याच वेळात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट आणि कलाकारांची घोषणा केली जाणार आहे.
- गोष्ट एका पैठणीची सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
- पार्श्वगायनाचा उत्कृष्ट पुरस्कार राहुल देशपांडेना
- अवांछित आणि गोदाकाठला विशेष पुरस्कार
- बॉलिवूड अभिनेता तान्हाजी चित्रपटासाठी अजय देवगनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
- '१२३२ किलोमीटर मारेंगे तो वहीं जाकर'साठी विशाल भारद्वाज यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार.
- मोस्ट फिल्म-फ्रेंडली (विशेष उल्लेख) पुरस्कार उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशला.

