Marathi serial : स्वीटू-मोहितच्या लग्नावरून प्रेक्षकांचा मोठा अपेक्षाभंग | पुढारी

Marathi serial : स्वीटू-मोहितच्या लग्नावरून प्रेक्षकांचा मोठा अपेक्षाभंग

मुंबई ; पुढारी आनलाईन : झी मराठीवरील प्रचंड लोकप्रिय मालिका (Marathi serial) ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मध्ये प्रत्येक दिवशी नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. पण या मालिकेला आता प्रचंड ट्रोल केले जात आहे. ही मालिका बंद करण्याचीच मागणी प्रेक्षक करत आहेत. कारण, यातून प्रेक्षकांचा मोठा अपेक्षाभंग झालेला आहे. त्यावरून मोठ्या प्रमाणात मिम्सही व्हायरल होत आहेत.

झी मराठीवरील या मालिकेचा (Marathi serial) २२ ऑगस्टला दोन तासांचा विशेष भाग प्रसारीत करण्यात आला होता. या विशेष भागामध्ये मालिकेच्या भागामध्ये स्वीटू वरमाळा घेऊन लग्नाच्या मंडपात आनंदात उभी असते. यानंतर अंतरपाट खाली पडताच तिच्या समोर वेगळेच काही तरी घडते. आणि ती समोर पाहताच स्तब्ध उभी राहते. हा उत्कंठा वाढवणारा महाएपिसोड मात्र काहीतरी वेगळाच होता.

सध्या या मालिकेत ओम आणि स्वीटू यांच्या लग्नाचा समारंभ सुरू आहे. अनेक कठीण प्रसंगांनंतर अखेर ओम आणि स्वीटूच लग्नं होत आहे. मात्र त्यातही अनेक विघ्न पाहायला मिळत आहेत. तर या मालिकेत मालविकाने तिची कटकारस्थान अजूनही सुरूच ठेवली आहेत. साखरपुडा, हळद सगळे कार्यक्रम पार पडल्यानंतर मात्र अचानक ओम लग्नातून गायब झाला. लग्न सोडून ओम दादांना शोधायला जाताना दाखवला आहे. यानंतर मुहूर्ताची वेळ पुढे जात असते. तेव्हा स्वीटूसोबत मोहित लग्नाला उभा राहतो.

या दोन तासांच्या भागात दाखवला गेलेला ट्विस्ट प्रत्यक्षात प्रेक्षकांना कुठेच पाहायला मिळाला नाही. याउलट मोहित स्वीटूच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तिच्याशी लग्न करतो. ओम आणि स्वीटू अखेर सर्व संकटावर मात करत लग्न करतील, असे सगळ्यांना वाटत हाेते. मात्र या दोन तासांच्या महाएपिसोडने प्रेक्षकांची निराशा केली आहे. या अचानक आलेल्या ट्विस्टने सगळेच हैराण झाले आहेत.

दोन तासांच्या महाएपिसोडने शेवटी मालिकेच्या लेखकाने ही कथा वेगळ्याच ट्रॅकवर नेऊन सोडली. म्हणूनच प्रेक्षकांनी या मालिकेबाबत संतापजनक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. प्रक्षेकांना वाटते की या महाएपिसाेडने आमचे दोन तास फुकट गेले असेच चित्र निर्माण झाले आहे. मालिकेच्या या महाएपिसोडमध्ये वेगळेच काहीतरी दाखवून या मालिकेत प्रेक्षकांची दिशाभूल करत आहेत अशा प्रकारच्या तीव्र प्रतिक्रिया प्रेक्षकांनी आता व्यक्त केल्या आहेत. तेव्हा आता मालिकेत पुढे नक्की काय घडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

हे वाचलंत का ?

Back to top button