rohit chandel : काशीबाई बाजीराव बल्लाळ मालिकेच्या 'बाजीराव'विषयी माहिती आहे का?

पुढारी आॅनलाईन डेस्क : काशीबाई बाजीराव बल्लाळ या मांलिकेत बाजीराव पेशवा यांची भूमिका अभिनेता रोहित चंदेल याने साकारली आहे. रोहित २७ वर्षांचा आहे. दमदार अभिनय आणि ऐतिहासिक पात्र साकारण्याची क्षमतेमुळे रोहितला प्रचंड लोकप्रियता मिळालीय. काशीबाई बाजीराव मस्तानी या मालिकेने अल्पावधीतचं लोकप्रियता मिळवली आहे.
रोहित एक अभिनेता आणि माॅडेल आहे. त्याचा जन्म महाराष्ट्रातील शहादा येथे २६ सप्टेंबर, १९९५ रोजी झाला. त्याने इंजिनिअरींग केलं आहे. यानंतर तो अभिनय क्षेत्राकडे वळला. त्याचबरोबर त्याने माॅडेलिंगही सुरू केले.
रोहितला डान्स करण्याची खूप आवड आहे. तो चांगलं गातोदेखील. तसेच अँकरिंग चांगल्या प्रकारे करतो. त्याची आवडती अभिनेत्री कंगना राणावत आहे. त्याचा आवडता गायक ए आर रहमान असून रणबीर कपूर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी त्याचे आवडते अभिनेते आहेत.
टीव्हीवरील हर मुश्किल का हल अकबर बिरबल या मालिका मध्येही तो दिसला हाेता . तसेच ये उन दिनों की बात है मध्ये तो समरच्या सावत्र भावाच्या भूमिकेत दिसला होता. आता तो काशीबाई बाजीराव बल्लाळ या मालिकेत तरुणपणीच्या बाजीराव यांच्या भूमिकेत काम करत आहे.
रोहितला या ऐतिहासिक मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारायला मिळतेय. त्याने या भूमिकेसाठी व्यक्तिमत्त्वाचा अभ्यासही केलाय. देहबोली, भाषा, व्यक्तिमत्व प्रभावी होण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतलीय.
- HBD Priyanka Chopra : छोट्या गावातील मुलगी ते हॉलिवूडची हिरोईन कशी झाली प्रियांका?
- ट्रोल होत असलेल्या सुश्मिताबाबत माजी प्रियकर विक्रम भट बोलला असं काही की सगळ्यांच्या भुवया उंचावल्या
- देशातील केवळ 50 टक्के शेतकऱ्यांनाच मिळाला कृषी कर्जमाफी योजनेचा लाभ : SBI च्या अहवालातील माहिती
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram