जगा आणि जगू द्या, ललित मोदी यांचे ट्रोलर्संना प्रत्युत्तर

जगा आणि जगू द्या, ललित मोदी यांचे ट्रोलर्संना प्रत्युत्तर

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : आयपीएल कमिशनर ललित मोदी सध्या बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेन हिच्याबरोबरच्या रिलेनशिपवरून चर्चेत आहेत. मोदी यांनी 14 जुलै रोजी सुश्मिता सेन हिच्यासमवेत रिलेशनशिपमध्ये असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले होते. त्यानंतर मोदी यांना सोशल मीडियावर खूपच ट्रोल केले होते. रविवारी मोदी यांनी इंस्ट्राग्रामवर पोस्ट लिहून ट्रोलर्संना प्रत्युत्तर दिले आहे. दोन माणसांमध्ये मैत्री असू शकत नाही काय? जगा आणि जगू द्या, असे उत्तर मोदी यांनी दिले आहे.

मला सोशल मीडियावर ट्रोल करण्याचे कारणच काय? कोणी मला समजावून घेऊ शकत नाही काय? सध्या आम्ही वयाच्या मध्यावर आहोत. माझ्यात आणि सुश्मितामध्ये चांगली केमिस्ट्री जमली आहे. हे मला खूपच सुखद आहे, असे मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. लोक मला भगोडा म्हणतात. मला कोणत्या न्यायालयाने दोषी ठरवले आहे, ते सांगा, असेही मोदी यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news