सोशल मीडियापासून सामंथा झाली दूर? | पुढारी

सोशल मीडियापासून सामंथा झाली दूर?

नवी दिल्ली : दरक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या चाहत्यांना आपले फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. याशिवाय ती आपल्या प्रोफेशनल लाईफचेही सातत्याने अपडेट देत असते. मात्र, गेल्या 15 दिवसांपासून सामंथा सोशल मीडियापासून दूर आहे. 30 जूनपासून एकही पोस्ट शेअर न केल्याने सामंथाचे चाहते चिंतेत आहेत.

गेल्या दोन आठवड्यांपासून सामंथा सोशल मीडियाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर सक्रिय असलेली दिसत नाही. तिने असे का करावे, असा प्रश्न चाहत्यांना सतावत आहे. काहींच्या मते, सामंथा सध्या आपले फॅन्स आणि फॉलोअर्ससोबत चर्चा करण्याच्या मूडमध्ये नसावी; तर काहींच्या मते, ही अभिनेत्री एखाद्या बड्या प्रोजेक्टची तयारी करत असावी. एकूणच काय, सामंथाचे सोशल मीडियावर सक्रिय न राहणेही सध्या चर्चेचा विषय बनले आहे.

Back to top button