जान्हवीचा ‘गुडलक जेरी’! | पुढारी

जान्हवीचा ‘गुडलक जेरी’!

‘धडक’ नंतर आता जान्हवी कपूरने स्वतःमध्ये अनेक बदल केले आहेत. लूकपासून ते अभिनयापर्यंत अनेक बाबतीत आता एक वेगळी जान्हवी दिसून येऊ शकते. तिच्या आगामी ‘गुडलक जेरी’ या चित्रपटाचा टीझर आता रीलिज झाला आहे.

आर्थिक परिस्थितीमुळे ड्रग्ज विक्री करणार्‍या जेरी नावाच्या तरुणीची भूमिका जान्हवीने या चित्रपटात साकारली आहे. घरी कर्करोगाने आजारी असलेली आई व शिक्षण घेणारी बहीण असते. या दोघींसाठी जेरी ड्रग्ज विक्री करणार्‍या टोळीत सामील होते. पुढे काय घडते, हे चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. टीझरमध्ये जान्हवीचा सिंपल लूक लक्ष वेधून घेत आहे.

हा चित्रपट 29 जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. चित्रपटात दीपक डोबरीयाल, मीता वशिष्ठ, नीरज सूद यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सिद्धार्थ सेनगुप्‍ता याने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Back to top button