अनन्या करतेय आदित्यला डेट? | पुढारी

अनन्या करतेय आदित्यला डेट?

या बॉलीवूडमध्ये कधी ब्रेकअप होईल आणि कधी कुणाशी नवे सूत जुळेल हे काही सांगता येत नाही.

अनन्या पांडे आणि इशान खट्टर हे तीन वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. दोघांनी ‘खालीपिली’ या चित्रपटात एकत्र कामही केले होते. मात्र, आता दोघांचा ब्रेकअप झाला असल्याचे कानावर येईपर्यंत अनन्या ‘आशिकी-2’ फेम आदित्य रॉय कपूरला डेट करीत असल्याचेही आता ऐकिवात आहे.

अर्थात दोघांनी याबाबत गुप्‍तताच पाळलेली आहे. मात्र, एका वृत्तानुसार दोघांमधील नाते आता केवळ मैत्रीपेक्षा अधिक पुढे गेले आहे. इशानशी झालेल्या ब्रेकअपनंतर अनन्याने आदित्यमध्ये आपला नवा जोडीदार पाहिला असल्याचे समजते.

Back to top button