रणवीरने घेतला 119 कोटींचा क्‍वाड्राप्लेक्स | पुढारी

रणवीरने घेतला 119 कोटींचा क्‍वाड्राप्लेक्स

रणवीर सिंह आता शाहरूख खान आणि सलमान खान यांचा शेजारी बनला आहे. त्याने मुंबईतील वांद्रे येथे सुमारे 119 कोटी रुपयांना एक क्‍वाड्राप्लेक्स विकत घेतला आहे. त्याची क्‍वाड्राप्लेक्स इमारत ‘मन्‍नत’ आणि ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’च्या दरम्यान आहे.

मीडिया रिपोर्टस्नुसार, ओह फाईव्ह ओह मीडिया वर्क्स एलएलपीने वांद्रे येथील सागर रेशम नावाच्या भव्य इमारतीमधील क्‍वाड्राप्लेक्ससाठी करार केला आहे. हे 16,17,18 आणि 19 व्या मजल्यावर आहे. रणवीरची ही नवीन प्रॉपर्टी बीजे रोड बँडस्टँड, वांद्रे येथे आहे. रणवीर सिंहच्या बाजूने व्यवहार करणारी फर्म त्याचे वडील जुगजित सुंदर सिंह भवनानी यांच्या मालकीची आहे.

रणवीरच्या या नवीन घराचे एकूण क्षेत्रफळ 11,266 चौरस फूट आहे. या घरात 1300 चौरस फुटांचे टेरेस गार्डन आहे. यासोबतच त्यांना 19 पार्किंगची जागाही देण्यात आली आहे.

Back to top button