Alizeh Agnihotri : सलमान खानची भाची करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण | पुढारी

Alizeh Agnihotri : सलमान खानची भाची करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

पुढारी ऑनलाईन डेस्क : येत्या काही महिन्यांत अनेक नवनवीन स्टार्सकिडस् नव्याने बॉलिवूडमध्ये पदापर्ण करत आहेत. सध्या बॉलिवूडचा दंबग स्टार सलमान खानची भाची आणि अतुल अग्निहोत्रीची मुलगी अलीजेह अग्निहोत्रीही ( Alizeh Agnihotri ) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यामुळे सलमानच्या भाचीला पाहण्यास चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, दिग्दर्शन आणि चित्रपट निर्माते सोमेंद्र पाधी हे नव्या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटातून सलमानची भाची अलीजेह अग्निहोत्री ही बॉलिवूड डेब्यू करणार आहे. या चित्रपटाच्या कथा आणि संवाद इतर गोष्टीवर सध्या काम सुरू आहे. परंतु, अद्याप निर्मात्यांनी चित्रपटाच्या नावाची घोषणा केलेली नाही.

यातील विशेष म्हणजे, या चित्रपटात फक्त अलीजेहच्या सभोवती कथानक न फिरता यात इतरही अनेक कलाकारांचा सहभाग असणार आहे. निर्माते सोमेंद्र पाधी यांनी उर्वरित कलाकारांची निवड झाल्यानंतर आम्ही चित्रपटाच्या नावाची घोषणा करू असे सांगितले आहे.

संबंधित बातम्या

याआधी अलीझेह अग्निहोत्रीने २००८ मध्ये वडील अतुल अग्निहोत्री यांच्या ‘हॅलो’ चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली होती. अलीजेहला या चित्रपटात नेमकी कोणाची भूमिका साकारणार आहे? याबाबत अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही. तर सलमानची भाची बॉलिवूडमध्ये येणार असल्याने चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by ali (@alizehagnihotri)

 

View this post on Instagram

 

A post shared by ali (@alizehagnihotri)

 

View this post on Instagram

 

A post shared by ali (@alizehagnihotri)

Back to top button