दीपिका-रणवीर थिरकले मनसोक्‍त | पुढारी

दीपिका-रणवीर थिरकले मनसोक्‍त

मुंबई ः दीपिका पदुकोण व रणवीर सिंग हे एक बॉलीवूडमधील चर्चित आणि लोकप्रिय दाम्पत्य आहे. सध्या ते अमेरिकेत आहेत. गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांचा नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात हे दाम्पत्य पोहोचले. कॅलिफोर्नियातील सेन जोस येथे पार पाडलेल्या कार्यक्रमात हे कपल मनसोक्‍त थिरकताना दिसले. रणवीरने तर थेट स्टेजवर जाऊन ‘अपना टाईम आयेगा’ हे गाणे गाण्यासही सुरुवात केली. महादेवन यांच्या या कॉन्सर्टमध्ये दीपिका-रणवीरसोबत दीपिकाचे आई-वडील प्रकाश पदुकोण, उज्ज्वला पदुकोण व बहीण अनिशा उपस्थित होते. या कार्यक्रमात दीपिका व रणवीर भारतीय वेशात दिसून आले. याप्रसंगीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

Back to top button