महेश बाबू याच्या भावाला पत्नीकडून मिळाला चप्पलाचा प्रसाद

पुढारी आनलाईन डेस्क : साऊथ सुपरस्टार महेश बाबू त्याच्या दमदार अभिनयामुळे आणि चित्रपटामुळे कायम चर्चेत असतो. मात्र यावेळी तो एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. महेश बाबूचा सावत्र भाऊ नरेश बाबू याला त्याच्या पत्नीने चारचौघात चप्पलेने मारहाण केली आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महेश बाबूचा मोठा भाऊ नरेश बाबू सध्या त्याच्या चौथ्या लग्नाच्या बातम्यांनी चर्चेत आहे. नरेश बाबू आणि त्याची तिसरी पत्नी रम्या रघुपती यांचे संबंध बिघडलेले असल्याच्या बातम्या येत आहेत. काही दिवसांपूर्वी नरेशची तिसरी पत्नी राम्याने हॉटेलमध्ये राहणाऱ्या नरेशवर चप्पलने हल्ला केला. यादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावेळी अनेक पोलीसही हस्तक्षेप करताना दिसून आले.
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये परस्त्रीसोबत नरेश बाबू यांना पाहिल्यानंतर त्याची तिसरी पत्नी राम्याचा राग अनावर झाला. ज्यामध्ये राम्या (रम्या रघुपती) चप्पल घेऊन त्याच्या मागे धावताना दिसत आहे. इतकेच नाही तर तिने आरडाओरडा करुन हॉटेलमध्ये गोंधळ घातला. परिणामी, पोलिसांनी राम्याला अडवले.
पोलिसांनी प्रकरण शांत केले
व्हिडिओमध्ये घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी रम्याला शांत केले आणि बराच गदारोळ केल्यानंतर तिला हॉटेलमधून बाहेर काढले. तर दुसरीकडे नरेश रम्यावर ओरडताना दिसला. दोघांमध्ये भांडण पाहून लोकांनाही आश्चर्य वाटते.
मिळालेल्या माहितीनुसार, नरेश बाबू यांनी तीन लग्न केले आहेत. आता चौथ्या लग्नाच्या तयारीला लागला आहे. नरेश बाबू पवित्रा सोबत चौथे लग्न करण्याचा विचार करत असल्याच्याही बातम्या येत आहेत.
नरेश बाबू महेश बाबूंचा सावत्र भाऊ
५९ वर्षीय नरेश हे तेलुगू चित्रपटाचे सुपरस्टार अभिनेते महेश बाबू यांचे सावत्र भाऊ आहेत. नरेश हे दिवंगत अभिनेत्री विजया निर्मला आणि त्यांच्या पहिल्या पतीचा मुलगा आहे. विजयाने नंतर महेश बाबूचे वडील आणि अभिनेता कृष्णा यांच्याशी लग्न केले. नरेशची पत्नी रम्यासोबत झालेल्या भांडणामुळे तो सध्या चर्चेत आहे. नरेशचे अभिनेता पवित्रा लोकेश सोबत अफेअर असून दोघांनी लग्नही केल्याचीही बातम्या येत आहेत. मात्र, नरेश यांनी या बातम्यांना अफवा असल्याचे म्हटले आहे.
नरेश यांनी म्हणले आहे की, पत्नी रम्याला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती त्यानंतर माझी बदनामी करण्यासाठी ती अशा खोट्या बातम्या पसरवत आहे. अभिनेत्री पवित्रा लोकेश हिनेही नरेशसोबतच्या लग्नाच्या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे.
View this post on Instagram