पुढारी ऑनलाईन डेस्क : अनिल कपूरने अलीकडेच त्याच्या 'ताल' या आयकॉनिक चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. सुभाष घाईच्या "सिनेमॅटिक मास्टरपीस" ची पुनरावृत्ती करताना अनिल कपूरने 'विक्रांत कपूर' ची भूमिका साकारणे हा त्याच्या कारकिर्दीचा "अविस्मरणीय क्षण" होता.
त्याने त्याच्या आवडत्या 'रमता जोगी' या गाण्याबद्दलची एक आठवण शेअर केली आहे. त्याने म्हटले की, "फराह खानला मूळ गाणे कोरिओग्राफ करायचे होते. परंतु तिने शेवटच्या क्षणी निवड रद्द केली. सरोज खान, दिग्गज कोरिओग्राफर, फिल्मिस्तानच्या शूटिंगच्या फक्त एक रात्री आधी तयारी झाली मी, उत्साही अभिनेता आहे. अजिबात रिहर्सल न करता गाणे केलं"
सुभाष घाई यांच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी त्यांचे "सदैव कृतज्ञ" आहे. अनिल कपूरने पुढे म्हटले आहे की "उत्तम नृत्यांगना ऐश्वर्या राय बच्चनसोबत काम करणं हा खास अनुभव होता. त्याने पुढे शेअर केले की, 'ताल' त्याच्यासाठी विशेष आहे कारण त्याने त्या वर्षी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून "सर्व प्रमुख पुरस्कार जिंकले. हा खरोखरच नम्र अनुभव होता.
पोस्टसोबतच त्याने 'ताल'च्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्टला त्याच्या चाहत्यांकडून जबरदस्त प्रेम मिळाले. 'बिग बॉस OTT ३' वरील त्याच्या होस्टिंगने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली असून सध्या त्याच्या पुढच्या थिएटर रिलीझ 'सुभेदार' ची तयारी करत आहे. निर्माते सुरेश त्रिवेणी यांच्यासोबतचे त्याचा हा पहिला चित्रपट आहे. यात तो RAW अधिकारी म्हणून दिसणार आहे.