Shehnaaz Kaur Gill
Shehnaaz Kaur Gill

Shehnaaz Kaur Gill : शहनाजचा मोठा खुलासा, म्हणून घेतली सलमानची गळाभेट

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस फेम फेम शहनाज गिलने ( Shehnaaz Kaur Gill ) नुकताच एका मुलाखतीत ट्रोलर्सला सडेतोड उत्तरे दिली आहेत. खरंतर शहनाज गिल यावर्षी अर्पिता खान आणि आयुष शर्माच्या ईद पार्टीमध्ये सहभागी झाली होती. यावेळी जेव्हा सलमान खानला हाताला धरून शहनाज आपल्या गाडीजवळ घेऊन आली. त्याआधी शहनाजने दबंग खानची गळाभेट घेतली होती. सलमान आणि शहनाजचा हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप व्हायरल झाला होता. आता तिने एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला की, मी सलमानला हग केल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं.

शहनाज गिल ( Shehnaaz Kaur Gill ) आणि सलमान खानचा ईद पार्टीतील एक व्हिडिओ समोर आला होता. हा व्हिडिओ पाहून अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे म्हटलं गेलं होतं. तर सिद्धार्थच्या चाहत्यांनी शहनाजवर अनेक प्रश्नाचा भडीमार करत तिला ट्रोलदेखील केले होतं. या घटनेला काही महिने उलटले आहेत. यानंतर शहनाजने या प्रकरणावर सध्या सडेतोड उत्तर दिले आहे.

नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत शहनाज गिलने सांगितले आहे की, 'मला फक्त सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यातील नकारात्मक बाजू मला पाहायची गरज वाटत नाही. जे चाहते माझ्यावर प्रेम करतात ते सर्व नकारात्मकतेवर पडदा टाकण्यासाठी पुरेसे आहे. सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे तेथे सर्वाचे लक्ष असते. ट्रोल होणे हा सेलिब्रिटीच्या आयुष्याचा एक भाग असून त्याला प्रत्येक स्टार्सला सामोरे जावे लागत आहे. सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू नाण्याला असतात. त्यामुळे आपण कोणत्या बाजूवर लक्ष केंद्रित करायचे स्वत: च ठरवावे. ' असे तिने म्हटलं आहे.

शहनाज गिलने अलीकडे मुंबईत 'उमंग २०२२' शोमध्ये भाग घेतला होता. यादरम्यान शहनाजच्या धमाकेदार डान्सने रसिकांची मने जिंकली. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, शहनाज गिल सलमान खान आणि कॅटरिना कैफच्या आगामी 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटात दिसणार आहे.

(video : viralbhayani, manav.manglani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news