मागास आयोगापुढे नागरिकांची सुनावणी | पुढारी

मागास आयोगापुढे नागरिकांची सुनावणी

पुणे : राज्य मागास आयोगाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या उपसमितीपुढे सगर गवंडी, टकारी, कडी गुजर आणि लिंगायत रड्डी या समाजातील नागरिकांची सुनावणी झाली. या सुनावणीस आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके आणि गोविंद काळे हे सदस्य उपस्थित होते.

याबाबत माहिती देताना राज्य मागास आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके म्हणाले, ‘गेल्या चौदा ते पंधरा वर्षांपासून राज्यात या समाजाची ओबीसी समाजामध्ये समावेश करावा, अशी मागणी होत आहे. तसेच त्यांच्या या मागणीची सुमारे 105 प्रकरणे प्रलंबित आहेत. या समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विभागानुसार सुनावण्या सुरू आहेत.’

Back to top button