‘सॅम मानेकशॉ’चे शूटिंग ऑगस्टमध्ये

‘सॅम मानेकशॉ’चे शूटिंग ऑगस्टमध्ये
Published on: 
Updated on: 

1971 च्या युद्धात पाकिस्तानचे शकले पडले आणि बांगलादेशाची निर्मिती झाली. या युद्धातील नायक म्हणजे सॅम मानेकशॉ. देशाच्या या पहिल्या फिल्ड मार्शलच्या जीवनावर आधारित चित्रपट आता बनवला जात आहे. मेघना गुलजार ही या चित्रपटाची दिग्दर्शिका आहे. यापूर्वी मेघनाने दीपिका पदुकोणच्या 'छपाक'चे दिग्दर्शन केले होते. आता या नव्या चित्रपटाचे शूटिंग ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे. यामध्ये विकी कौशल शीर्षक भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात 'दंगल' गर्ल्स फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news