सबाचा देसी लूक! | पुढारी

सबाचा देसी लूक!

ही सबा आझाद कोण आहे, माहिती आहे का? ती हृतिक रोशनची गर्लफ्रेंड आहे. तिने नुकताच सोशल मीडियात एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये ती आकाशी रंगाच्या सलवार कमीजमध्ये दिसून येते. मोकळे केस, कानात झुमके आणि हातात बांगड्या असलेला तिचा हा ‘देसी लूक’ पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले. विशेष म्हणजे हृतिकची ‘एक्स वाईफ’ सुझाननेही तिच्या या फोटोचे कौतुक करीत म्हटले, ‘खूपच गोड दिसत आहेस सबा’! सुझान सध्या तिचा बॉयफ्रेंड अर्स्लन गोनी याच्यासमवेत अमेरिकेच्या ट्रिपवर आहे. तेथील अनेक छायाचित्रे व व्हिडीओ ती शेअर करीत असते. सबाने तिला उत्तर देत त्याचा उल्‍लेख केला व म्हटले, ‘थँक्यू माझी सूझ! तुझ्या हॉलिडे स्टोरिज मला आवडल्या, अशाच अपडेट करीत रहा!’ या दोघींमधील बाँडिंग पाहून ‘रिश्तों के भी रूप बदलते है’ असे म्हणूया की, ‘सौतन बनी सहेली’ असे म्हणायचे? विशेष म्हणजे हृतिक आणि अर्स्लनमध्येही चांगली मैत्री आहे! एकंदरीतच घटस्फोटानंतर हृतिक व सुझान आपापल्या जीवनात पुढे निघून गेले आहेत.

Back to top button