Richa Chadha : ‘सेटवर महिला टेक्निशियनना सोसावं लागतं सेक्सिजम’

richa chadha
richa chadha

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडची बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री रिचा चड्ढा नेहमीच तिच्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असते. नुकतेच तिने सेटवर काम करणाऱ्या महिला टेक्निशियनबाबत मोठे वक्तव्य केले आहे. तिने म्हटले आहे की ,लैंगिकता ही केवळ चित्रपटसृष्टीतच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर समाजात एक चुकीचे वर्तन आहे. अलीकडेच अभिनेत्री रिचाने तिचा पार्टनर अभिनेता अली फजलसोबत पुशिंग बटन स्टुडिओ ही प्रोडक्शन कंपनी सुरू केली आहे. लाईटिंग विभागात महिलांची संख्या कमी आहे. त्यामुळे दोघेही त्यांच्या पहिल्या प्रोडक्शन गर्ल्स विल बी गर्ल्ससाठी महिला शोधत आहेत.

जेव्हा रिचाला विचारण्यात आले की, महिला तंत्रज्ञांना चित्रपटाच्या सेटवर कोणत्याही प्रकारच्या लैंगिकतेचा सामना करावा लागतो का? प्रत्युत्तरादाखल ती म्हणाली की, आपल्या समाजात लैंगिकता ही एक डिफॉल्ट वागणूक आहे. कामाच्या ठिकाणी महिलांची संख्या वाढवून, आम्ही हे हळूहळू बदलू इच्छित आहोत, अशा प्रकारे बदल सुरू होतो आणि मला तेच करायचे आहे.

रिचा आणि अली फजल हे गर्ल्स विल बी गर्ल्स डायरेक्टर लिस्टी तलाटी यांच्या सहकार्याने १० महिलांना लाइटिंग विभागात प्रशिक्षण देत आहेत. प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांपैकी २ महिलांना पदार्पणाच्या निर्मितीसाठी कामावर घेतले जाईल. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रिचा म्हणाली की, असे पाऊल उचलून ती इंडस्ट्रीमध्ये ऑफ कॅमेरा काम करणाऱ्या महिलांसाठी काही गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करत आहे.

तिने सांगितले की, प्रशिक्षणादरम्यान महिलांना लाइटिंग उपकरणे हाताळण्यास शिकवले जाईल. लाईटिंग विभागात महिलांचे प्रमाण कमी होते, त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. महिला शिकत आहेत हे पाहून आम्हालाही आनंद होतो. आम्ही आमचे प्रयत्न सुरूच ठेवू आणि महिलांना केवळ प्रकाशयोजनाच नाही तर इतर क्षेत्रातही शिकवले जाईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news