Jurassic Park : केवळ तीन दिवसांत साडेतीन हजार कोटींची कमाई! | पुढारी

Jurassic Park : केवळ तीन दिवसांत साडेतीन हजार कोटींची कमाई!

‘ज्युरासिक पार्क’ हा चित्रपट अनेकांनी आपल्या लहानपणी पाहिलेला असेल. या चित्रपटाचा सातवा फ्रँचायझी चित्रपट ‘ज्युरासिक वर्ल्ड डोमिनियन’ 10 जूनला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने केवळ 2 दिवसांत जगभर 194 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 1500 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. हा आकडा आता तीन दिवसांत 400 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 59 दशलक्ष डॉलर्सची (460 कोटी रुपये) कमाई केली होती. ‘ज्युरासिक पार्क’ व ‘ज्युरासिक वर्ल्ड’चे आतापर्यंत सहा चित्रपट आले आहेत.

Back to top button