Urvashi Rautela And Rishabh Pant : उर्वशी रौतेला समोर चाहत्यांचा ऋषभ पंतच्या नावाचा गजर! | पुढारी

Urvashi Rautela And Rishabh Pant : उर्वशी रौतेला समोर चाहत्यांचा ऋषभ पंतच्या नावाचा गजर!

मुंबई; पुढारी ऑनलाईन : आपल्याकडे चित्रपट अभिनेत्री आणि क्रिकेटपटू यांची नावे अनेकवेळा एकमेंकाशी जोडली गेली आहेत. त्यातील काही जोड्या एकत्र येण्यात यशस्वीसुद्धा झाल्या आहेत. तसेच ज्या जोडींचे बिनसलं किंवा दुरावा निर्माण झाला त्यांची नावे कोणत्या न कोणत्या औचित्याने समोर येत असतात. असं काहिसं सध्या अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela And Rishabh Pant) सोबत घडलं आहे. भारताचा स्फोटक फलंदाज ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेलाचे चार वर्षापुर्वी नाव जोडले गेले होते. त्यानंतर दोघाचे ब्रेकअप झाले. यानंतर सुद्धा अद्याप चाहते त्यांना एकमेंकांची आठवण करुन देतात. असाच काहिसा अनुभव उर्वशील रौतेलाला एका कार्यक्रमा दरम्यान आला.

उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंतचे ब्रेकअप (Urvashi Rautela And Rishabh Pant)

अभिनेत्री उर्वशी रौतेला आता बॉलिवूडमध्ये चांगलीच स्थिरावत आहे. चार वर्षांपुर्वी उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यात वाढलेल्या जवळीकीची चर्चा होत होती. तेव्हा दोघेही एकमेकांना डेट करताना व अनेक ठिकाणी एकत्र असताना पाहण्यात आले होते. दोघांच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगली होती. उर्वशी रौतेला देखिल आपीएलच्या सामन्यामध्ये ऋषभला चिअर करताना दिसत होती. यानंतर या दोघांमध्ये ब्रेकअप झाला आणि दोघांनी आता एकमेकांसमोर येणं आणि भेटणं टाळलं आहे.

या दोघांमध्ये सर्व काही संपले असताना मात्र दोघांच्या चाहत्यांना उर्वशी आणि ऋषभ एकमेकांपासून दूर गेल्याचे कदाचित पटत नसावं किंवा त्यांना ते मान्य नसावं. एका कार्यक्रमात अभिनेत्री उर्वशी रौतेला पोहचली असताना तिच्या चाहत्यांनी तिला पाहताच ‘ऋषभ ऋषभ ’ ओरडत ऋषभचा नाराच द्यायला सुरुवात केली. मात्र यावेळी उर्वशी रौतेलाने कोणतीही प्रतिक्रिया न देता चाहत्यांना हात दाखवत व स्मित हास्य देत निघून गेली.

 

View this post on Instagram

 

A post shared by High bro (@high.br0)

उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांनी एकमेकांना केले होते ब्लॉक (Urvashi Rautela And Rishabh Pant)

सुत्रांच्या माहितीनुसार, उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांचे ब्रेकअप वेळी इतकं फाटलं होतं की, त्यांनी एकमेकांना सोशल मीडियावर ब्लॉक केलं होतं. आता त्यांच्या ब्रेकअपचं कारण काय होतं हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण, अद्याप ऋषभच्या नावाने उर्वशीला तिचे चाहते चिडवत असतात.

एका कॉलेजच्या फेस्टीव्हलमध्ये उर्वशीला पाहून गर्दीने दिला ऋषभचा नारा (Urvashi Rautela And Rishabh Pant)

अलिकडेच उर्वशी रौतला एका महाविद्यालायच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमावेळी तिचे आगमन होताचा तिच्या चाहत्यांनी व महाविद्यालायच्या तरुण तरुणींनी तिला गराडा घातला होता. यावेळी तिला पाहताच गर्दीतून ‘ऋषभ, ऋषभ’ असा मोठ मोठ्याने आवाज येऊ लागला. हा आवाज स्पष्टपणे उर्वशीला ऐकू येत होता. मात्र, उर्वशी न गोंधळता हाथ हलवत संपूर्ण गर्दीला स्मित हास्याने अभिवादन करत पुढे निघून गेली.

सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेसोबत टी २० मालिका सुरु आहे. या मालिकेत ऋषभ पंत हा भारतातचा हंगामी कर्णधार पदाची भूमिका पार पडत आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागल्याने ऋषभ पंतवरील दबाव चांगलाच वाढला आहे. तर दुसरीकडे उर्वशीचा विचार केला तर सध्या ती वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. सध्या ती दक्षिणात्य चित्रपटात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती ‘ब्लॅक रोज’ आणि द लेजंड या तामीळ आणि तेलुगू सिनेमातून दक्षिणेत पदार्पण करत आहे. तसेच बॉलवूडमध्ये ती आगामी ‘दिल है ग्रे’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

Back to top button